

मुंबई : सायकल चालविण्यासाठी देतो असे सांगून एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला दुकानात आणून तिच्यावर सायकल रिपेरिंग करणार्या 47 वर्षांच्या आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच आरोपीस नेहरुनगर पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. 34 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबीयांसोबत चेंबूर परिसरात राहते. पिडीत तिची चौदा वर्षांची मुलगी आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता मुलगी परिसरात खेळत होती. यावेळी आरोपीने तिला सायकल चालविण्यासाठी देतो असे सांगून दुकानात बोलावून घेतल. ती दुकानात गेल्यानंतर त्याने आतून दुकानाचा दरवाजा बंदकरुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. तिने विरोध करुनही त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली. ती घरी आल्यानंतर तिने आईला घडललेा प्रकार सांगितला. या माहितीनंतर तिने नेहरुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तिथे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी अटक केली.