Crime News Mumbai: महाराष्ट्रात चाललंय काय.... गुंडांनी थेट पोलिसांची वर्दीच फाडण्याचा केला प्रयत्न
Crime News Mumbai: कांदवलीत काल (दि. १४) रात्री गुंडांनी पोलिसांनाचा मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. कांदवलीमधील एकता नगर येथील परिसरात ही घटना घडली. एकता नगर मधील दोन गटात राडा झाला होता. त्यावेळी पोलिसांनी तिथे जाऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत गुंडांनी थेट पोलिसांच्या वर्दीलाच हात घातला.
नेमकी घटना काय?
राडा: कांदिवलीच्या एकता नगरमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी (राडा) सुरू होती.
पोलिसांना पाचारण: १०० नंबरवर कॉल आल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
मध्यस्थीचा प्रयत्न: पोलिसांनी दोन्ही गटांतील वाद सोडवण्याचा आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
गुंडांचा हल्ला: मात्र, त्यावेळी दोन्ही गटातील गुंड पोलिसांवरच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांच्या वर्दीवर हात टाकला आणि ती फाडण्याचा प्रयत्न केला.
मारहाण: या घटनेत कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
मनसेचा सवाल; गुंडांचे वर्चस्व वाढले?
या घटनेमुळे आता 'गुंडांचे वर्चस्व सुरू झाले आहे का?' असा सवाल उपस्थित होत आहे. मनसेचे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. "जेव्हा दोन गटांत हाणामारी होते, तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही पोलिसांचा धाक राहिला नाही का?" असा प्रश्न त्यांनी केला आहे.
गुन्हा दाखल
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. दोन गटांतील हाणामारीचे नेमके कारण काय होते, याचा तपासही सध्या सुरू आहे.
या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या सुरक्षिततेचा आणि शहरातील गुंडगिरीच्या वाढत्या प्रभावाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.

