No honorarium hike for Mumbai corporators-मुंबईच्या नगरसेवकांना मानधनवाढ नाही?

मुंबईच्या नगरसेवकांना मानधनवाढ नाही?
money
money pudhari file photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

वाढती महागाई लक्षात घेता नगरसेवकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले प्रकल्प पार पाडण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. सध्या विविध बँकांमध्ये असलेल्या मुदत ठेवी मोडून हा खर्च भागवण्यात येत आहे. त्यामुळे नगरसेवक यांच्या मानधनात वाढ करण्यात पालिका प्रशासन उत्सुक नसल्याचे समजते.

मुंबईतील नगरसेवकांना पूर्वी दहा हजार मानधन देण्यात येत होते. मात्र वाढत्या महागाईमुळे जुलै २०१७ मध्ये नगरसेवकांचे मानधन वाढवून २५ हजार रुपये मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हे मानधनही कमी पडत असल्यामुळे मानधनांमध्ये किमान अजून ७५ हजार रुपये म्हणजेच मासिक १ लाख रुपयापर्यंत मानधन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. परंतु मुंबई महापालिकेच्या वतीने सध्या कोस्टल रोडसह गोरेगाव मुलुंड लिंक रोड व अन्य मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असून यासाठी येणाऱ्या काळात अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी लागणार आहे.

सध्या ही कामे विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवी मोडून करण्यात येत आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या मानधनांमध्ये वाढ केल्यास मोठ्या निधीची आवश्यकता वाटणार आहे. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे सध्या तरी निधी वाढवणे अशक्य असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या नगरसेवकांना मासिक मानधन देण्यासाठी ५९ लाख २५ हजार रुपये खर्च येत आहे. यात अजून ७५ हजार रुपये वाढ केल्यास २ कोटी ३७ लाख रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच वार्षिक २८ कोटी ४४ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. एवढा खर्च पालिकेला शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

money
Navi Mumbai cleanest city India - 'स्वच्छ' शहरांत नवी मुंबई देशात प्रथम

मानधन वाढवण्याचा अधिकार शासनाला

नगरसेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून घेतला जातो. परंतु तसा प्रस्ताव महापालिकेकडून जाणे अपेक्षित आहे. मुंबई महापालिका अ प्लस मध्ये येत असल्यामुळे अन्य महानगरपालिकेपेक्षा या महापालिकेतील नगरसेवकांना जास्त मानधन मिळते. २०१७ पासून मुंबईतील नगरसेवकांना २५ हजार रुपये तर इतर महापालिकांच्या श्रेणीनुसार महानगरपालिकेतील नगरसेवकांना १० ते २० रुपयांपर्यंत मानधन देण्यात येते.

money
संतापजनक! मुंबई लोकलमध्ये छेडछाडीला विरोध करताच तरुणीला ढकलले रुळांवर; ट्रेनखाली गमावला एक हात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.