Mumbai Car Accident : मुंबईत भरधाव बीएमडब्ल्यू कारला भीषण अपघात, तीन तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी

कोस्टल रोडवरील पुलावर दुर्घटना
Mumbai Car Accident
Pudhari
Published on: 
Updated on: 
Summary

अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले हा भीषण अपघात झाल्‍याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Mumbai Coastal Road BMW Accident

मुंबई : भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार अपघातग्रस्त होऊन खाली कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना आज (दि.२०) पहाटे कोस्टल रोडवरील पुलावर घडली. प्राथमिक तपासानुसार, अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले हा भीषण अपघात झाला. मृत तिघेही बीएमडब्ल्यू (BMW) कारमध्ये होते.

भरधाव कार पुलावरुन खाली कोसळली

कोस्टल रोड कंट्रोल रूमने दिलेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने पहाटे ५:२० च्या सुमारास काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार जात होती. अचानक कार पुलावरून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २० वर्षांचा तरुण जखमी आहे. त्‍याला नायर रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Mumbai Car Accident
Mumbai Metro 4 Accident: मेट्रोच्या बांधकामादरम्यान अपघात; दोन कामगारांचा मृत्यू

दोन मृतांची ओळख पटली

नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शनाय गज्जल (वय २१) आणि धिर्य सेठ (वय १७) यांची ओळख पटली आहे, तर एका अनोळखी २५ वर्षीय तरुणाला रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले; एका २० वर्षीय अनोळखी तरुणाची प्रकृती गंभीर असून तो ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. आहे.

Mumbai Car Accident
Mumbai BEST Bus Accident: अंधेरी गोखले पूल सिग्नलवर कंत्राटी बेस्ट बसचा अपघात; सहा वाहनांना धडक, तीन जण जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news