Mumbai Coastal Road: कोस्टल रोडवरील वेगाला लगाम कधी? वेगमर्यादेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुंबई कोस्टल रोडवर भरधाव BMW ७५ फूट खाली कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कोस्टल रोडवरील वेगमर्यादा आणि वेग उल्लंघनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
Mumbai Coastal Road
Mumbai Coastal RoadPudhari
Published on
Updated on

मुंबई: रविवारी पहाटे कोस्‍टल रोडच्‍या पुलावरून उडालेली भरधाव बीएमडब्‍लू ७५ फूट खाली कोसळून तीन विद्यार्थ्यांचा बळी गेल्‍याने मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्‍यासाठी बांधलेल्‍या कोस्टल रोडवरील वेगमर्यादेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियमानुसार, सरळ मार्गावर ताशी ८० किलोमीटर, बोगद्यात ताशी ६० किलोमीटर, तर वळण आणि मार्ग एकत्र येण्याच्या ठिकाणी ताशी ४० किलोमीटर वेगमर्यादा आहे.

Mumbai Coastal Road
Jogeshwari Ganesh Immersion Accident: गणेश विसर्जनादरम्यान अनर्थ! कृत्रिम तलावात करंट उतरला; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

तरीही या मार्गावर वेगमर्यादा ओलांडली जातेच. दुचाकी, तीनचाकी तसेच काही प्रकारच्या जड वाहनांना कोस्टल रोडवर प्रवेशबंदी आहे. त्‍यामुळे या मार्गावर चारचाकी वेगाचेच बळी सारखे नोंदवले जात आहेत.

सप्टेंबरच्या सुरुवातीला कोस्टल रोडच्या बोगद्यात महागड्या वाहनांच्या कथित रेसिंगचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, रविवारच्‍या अपघाताचा रेसिंगशी संबंध असल्याचे समोर आलेले नाही.

सुनसान कोस्‍टल रोडवर सूसाट जाण्‍याचा मोह नडला आणि बीएमडब्‍लूवरील विद्यार्थ्यांचे यांचे नियंत्रण सुटले, इतकाच प्राथमिक निष्‍कर्ष पोलिसांनी तुर्तास काढला आहे.

कोस्टल रोडवर वेगाचा कहर

८ मार्च २०२६ : पहाटेच्या वेळी काही दुचाकीस्वारांनी कोस्टल रोडवर बेकायदा प्रवेश करून वेगाने वाहने चालविल्याचे सीसीटीव्हीत आढळले. पोलिसांनी नंतर कारवाई केली.

२६ ऑगस्ट : कोस्टल रोडवर १६ वाहने वेगमर्यादा ओलांडताना आढळली. पोलिसांनी कारवाई केली.

Mumbai Coastal Road
Mumbai Crime News: टायर पंक्चर करून वाहन थांबवायचे अन्‌ दगडफेक, मारहाण करून लुटीचे तंत्र

३ सप्टेंबर : बोगद्यात लॅम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यूसह महागड्या वाहनांची कथित रेसिंग समोर आली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

८ सप्टेंबर : वेगमर्यादा उल्लंघनाच्या १६ वाहनांपैकी ११ वाहने जप्त करण्यात आली.

२० सप्टेंबर : लोटस जेट्टीजवळ बीएमडब्ल्यू पुलाच्या कठड्यावरून खाली कोसळली. तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news