Jogeshwari Ganesh Immersion Accident: गणेश विसर्जनादरम्यान अनर्थ! कृत्रिम तलावात करंट उतरला; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जोगेश्वरी पूर्वेतील शामनगर परिसरात गणेश विसर्जनादरम्यान कृत्रिम तलावातील यंत्रणेत विद्युत प्रवाह उतरल्याची घटना घडली. विजेचा धक्का लागून १९ वर्षीय रोहित राठोडचा मृत्यू झाला.
Electric Shock
Electric ShockPudhari
Published on
Updated on

जोगेश्वरी: गणेशोत्सवाच्या धामधुमीत मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा आणि ढिसाळ नियोजनाचा एक अतिशय भीषण आणि हृदयद्रावक घटना शनिवारी मध्यरात्री साडे बाराच्या दरम्यान गौरी गणपती विसर्जनादरम्यान जोगेश्वरी पूर्वेला घडली.

शामनगर परिसरात लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलावाच्या बाहेर लिली व्हाईट इमारतीजवळ उभारण्यात आलेल्या कृत्रिम पाँड मध्ये गणपतीचे विसर्जन सुरू असतानाच विजेचा शॉक लागून रोहित भीमसिंग राठोड या अवघ्या १९ वर्षांच्या निष्पाप तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Electric Shock
Mira Road Kidnapping Case: पाच लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण; चारचाकीत कोंबून बेदम मारहाण

आईचे छत्र आधीच हरपलेल्या या तरुणाच्या जाण्याने त्याच्या वृद्ध वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जोगेश्वरी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Electric Shock
Mumbra Mosquito Menace: मुंब्र्यात डासांचा विळखा; पालिकेची धूरफवारणी गायब

गणेश विसर्जन सुरू असताना विसर्जन स्थळावरील पाण्याच्या पाँड मधील यंत्रणेत अचानक विद्युत प्रवाह (करंट) उतरला. यामध्ये रोहित राठोड हा तरुण गंभीररीत्या होरपळला. त्याला तात्काळ नजीकच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news