

मुंबईः मुंबई येथे CNG गॅसचा पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. पण आरसीएफ कंपाऊंडमध्ये पाईपलाइनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक ठिकाणी गॅस पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट वाहनधारक व पेट्रोलपंपधारकांवर होणार आहे. ही दूरुस्ती तत्काळ नाही झाली तर अनेकांची वाहने थांबण्याची शक्यता आहे. कंपनीनेही असा अलर्ट दिला आहे. अनेक पंपावरही गॅसचा तुडवडा निर्माण झाला आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाईनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला होणारा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून (Mahanagar Gas Limited) गॅस पुरवठा खंडीत होऊ शकतो, असा अलर्ट देण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाईनमध्ये बिघाड झाला असून वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) चा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. महानगर गॅस लिमिटेड आपल्या घरगुती पीएनजी (PNG) ग्राहकांना प्राधान्याने विनाखंड पुरवठा करत असतो. पण एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला वायू पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक गॅस पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस पुरवठा करण्यात येईल, असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी स्टेशन बंद होण्याची शक्यता
गॅस प्रोसेसिंगच्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील अनेक सीएनजी स्टेशन बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्य परिवहन उपक्रमांमधील सीएनजी पुरवठ्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी स्टेशन बंद होण्याची शक्यता आहे. बाधित भागातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्यास सांगण्यात आले आहे.
सीजीएस वडाळा येथील गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंप बंद होण्याची शक्यता आहे. सीएनजी पुरवठा स्थिर होईपर्यंत टॅक्सी, ऑटो, बेस्ट बस आणि इतर सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
एमजीएलने दिले निवेदनाद्वारे दिली माहिती
आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे, वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. एमजीएल त्यांच्या घरगुती पीएनजी ग्राहकांना पुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्राधान्याने सुरू ठेवेल याची खात्री करत आहे. तथापि, सीजीएस वडाळा आणि एमजीएल पाइपलाइन नेटवर्कद्वारे गॅस पुरवठा थांबल्यामुळे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक उपक्रमांसाठी समर्पित सीएनजी स्टेशनसह सीएनजी स्टेशन चालू शकत नाहीत.
बाधित भागातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नुकसान दुरुस्त झाल्यानंतर आणि सीजीएस वडाळा येथे पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर एमजीएलच्या नेटवर्कमधील गॅस पुरवठा सामान्य होईल. झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. असेही कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.