

Mumbai division advanced facilities
रोहे: मध्य रेल्वे आपल्या विभागातील स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि सुरक्षा अधिकाधिक सुधारण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रवाशांना आरामदायी, सुलभ आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी महत्त्वपूर्ण उन्नतीकरणे आणि नवीन सोयी-सुविधां करण्यात आल्या आहेत.
ऑक्टोबर २०२५ महिन्यात मुंबई विभागाने प्रदान केलेल्या सुविधामध्ये प्रवासी सुविधा डोंबिवली (प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४) आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६) या स्थानकांवर प्रत्येकी २ अशा एकूण २ एस्कलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध स्थानकांवर ९२ अतिरिक्त ब्रशलेस डायरेक्ट करंट पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बीएलडीसी पंखे म्हणजे अशा प्रकारचे पंखे जे ब्रशलेस डीसी मोटरवर चालतात. हे पंखे पारंपरिक इंडक्शन मोटर पंख्यांपेक्षा अधिक ऊर्जा-कार्यक्षम असून कमी आवाज करतात.
कार्बन ब्रशेसऐवजी हे इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स आणि कायमस्वरूपी चुंबकांचा वापर करतात, ज्यामुळे ऊर्जेचा वापर सुमारे ५० ते ७० टक्क्यांनी कमी होतो. विविध स्थानकांवर ३३ नवीन एअर सर्क्युलेटर पंखे बसविण्यात आले आहेत. हे एअर सर्क्युलेटर्स पारंपरिक पंख्यांप्रमाणे फक्त एका दिशेने हवा न उडवता सतत आणि सर्वदिशांनी समान वायुप्रवाह निर्माण करतात.
विविध स्थानकांवर ३८६ एलईडी ट्यूब लाइट्स बसविण्यात आले आहेत. हे एलईडी ट्यूब लाइट्स ऊर्जा-कार्यक्षम असून त्यांचे कालमान (टिकाऊपणा) अधिक आहे तसेच त्याने देखभाल आणि बदलण्याचा खर्चही कमी होतो. हे अधिक उत्तम प्रकाश देतात आणि पर्यावरणपूरक आहेत.
प्रवासी माहितीमध्ये जीपीएस घड्याळे आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, उरण स्थानकावर एक जीपीएस टॉवर घड्याळ बसविण्यात आले आहे. माटुंगा स्थानकावरील सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीचे अद्ययावतीकरण करून ती IP-आधारित प्रणाली करण्यात आली आहे, ज्यामध्ये माहिती स्पष्ट आणि अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी ३५ स्पीकर्सची व्यवस्था आहे.
प्रवासी तिकीट सेवा मध्ये मध्य रेल्वेवर मोबाईल यूटीएस सहाय्यकांची सुविधा सुरू करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३ सहाय्यक कार्यरत आहेत. मोबाईल फोन आणि कंबरेला बांधता येणारी छोटी तिकीट-प्रिंटिंग मशीन देण्यात आल्यामुळे हे एम-यूटीएस सहाय्यक कॉन्कोर्सवर, होल्डिंग एरियामध्ये किंवा रेल्वे स्थानक परिसरात थांबलेल्या प्रवाशांपर्यंत जाऊन, प्रवासभाडे स्वीकारून तिकिटे तात्काळ जारी करतात.
मध्य रेल्वे स्थानक सुविधांचे उन्नतीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा समावेश करून प्रवाशांचा एकूण प्रवास अनुभव अधिक उत्तम करण्यावर भर दिला जात आहे. ही सर्व उपक्रम प्रवाशांसाठी अनुकूल अशा रेल्वे जाळ्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, सुलभता, सोय आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देतात.