Mumbai CNG Price Hike : मुंबईत सीएनजी दराचा भडका !

किलोचे दर 82 वरुन 84 रुपयांवर; प्रवास महागणार
Mumbai CNG Price Hike
मुंबईत सीएनजी दराचा भडका !pudhari photo
Published on
Updated on

मुंबई ः जागतिक आर्थिक मंदीचे सावट गडद होत असताना आणि पेट्रोल डिझेल दरवाढीची तलवार टांगती असतानाच, गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह महामुंबईप्रदेशात सीएनजीचे दर किलोमागे 2 रुपयांनी वाढले. महानगर गॅस लिमिटेडने ही दरवाढ मुंबई, ठाणे, नवी मुंबई म्हणजेच संपूर्ण महामुंबई प्रदेशात तत्काळ लागू केली आहे.

महामुंबईत सीएनजी 82 रुपये किलोने मिळत होता. त्यासाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. या दरवाढीचे व्यापक परिणाम आता दिसू लागतील. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी अजूनही 44 टक्के स्वस्त आणि डिझेलच्या तुलनेत 7 टक्के स्वस्त असल्याचा दावा महानगर गॅसने केला असला तरी सीएनजी दरवाढीमुळे ॲटोरिक्षा, टॅक्सीचे दर वाढवण्याची मागणी संघटनांनी केली आहे.

Mumbai CNG Price Hike
CNG Price Hike: ग्राहकांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात वाढ, आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?

डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरलेला रुपया आणि जगभरातील गॅस पुरवठ्याची विस्कळीत झालेली साखळी, त्यातून गॅस आयातीसाठी जादा मोजावे लागणारे पैसे ही या दरवाढीची कारणे असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे.

प.बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या की, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर भडकणार, असा अंदाज होताच. तो सीएनजीच्या बाबतीत खरा ठरला. युद्धस्थितीमुळे आता कोणत्याही क्षणी पेट्रोल, डिझेलचे दरही भडकू शकतात. त्याचे संकेत विमान कंपन्यांनी दिलेच आहेत. इंधन महागल्याने संपूर्ण विमान वाहतूक ठप्प होऊ शकते असा इशारा इंडियन एअरलाईन्स महासंघाने केंद्राला पत्र पाठवून दिला आहे.

Mumbai CNG Price Hike
CNG Price Hike: LPG आणि दुधानंतर आणखी एक झटका; आता CNGही झाला महाग, किती वाढली किंमत?
  • या दरवाढीचा थेट फटका रायगडसह महामुंबई प्रदेशात सीएनजीवर धावणाऱ्या 12.84 लाख वाहनांना बसणार आहे. त्यात 4.7 लाख ऑटोरिक्षा असून 1.6 टॅक्सी आहेत. त्याशिवाय 5 लाख खासगी वाहनेही सीएनजीवर धावतात. बेस्ट, नवी मुंबई पालिका परिवहन, राज्य परिवहन, टीएमटीसह 51 हजार बस गाड्या, टेम्पो सीएनजीवर धावतात. या सर्वांचेच गणित आता सीएनजी दरवाढीने बिघडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news