CNG Price Hike: ग्राहकांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात वाढ, आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?

Pune CNG Price Hike: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या भागांमध्ये सीएनजीच्या दरात १.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एमएनजीएलने ९ मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून नवीन दर ९२.२५ रुपये प्रति किलो लागू केला आहे.
CNG Price Hike
CNG Price HikePudhari
Published on
Updated on

Pune CNG Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे आधीच वाहनचालकांचे बजेट बिघडले असताना आता सीएनजी वापरणाऱ्या ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. Maharashtra Natural Gas Limited (MNGL) ने सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ जाहीर केली आहे.

९ मे २०२६ रोजी मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील भागांमध्ये सीएनजीचा दर किलोमागे १.५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यामुळे आधी ९०.७५ रुपये असलेला दर आता ९२.२५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. ही वाढ चाकण, तळेगाव, हिंजवडीसह आसपासच्या भागांनाही लागू होणार आहे.

एमएनजीएलकडून दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक वायू खरेदीचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरू आहेत. त्याचा थेट परिणाम शहरांतील सीएनजी दरांवर होत असल्याचे सांगितले जात आहे.

दरवाढीनंतर आता पुण्यातील रिक्षाचालक, कॅब चालक आणि रोज मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे. अनेकांनी पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त पर्याय म्हणून सीएनजी वाहनांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वारंवार होणाऱ्या दरवाढींमुळे आता सीएनजीचे गणितही बदलू लागल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये सुरू आहे.

CNG Price Hike
RBI Rules: कर्ज फेडलं नाही तर बँक तुमचे.... आरबीआयच्या प्रस्तावाने कर्जदारांना फोडला घाम; नवीन नियम काय आहेत?

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सीएनजीच्या दरात मोठी तफावत दिसत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दर ९२.२५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला असताना मुंबईत सीएनजीचा दर सुमारे ८१ रुपये प्रति किलो आहे. तर नवी मुंबईमध्ये तो जवळपास ९३.६५ रुपये प्रति किलो असल्याची माहिती समोर आली आहे.

CNG Price Hike
DC vs KKR | फिन अ‍ॅलनचे तुफानी नाबाद शतक

वाहनचालक संघटनांनी या दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, गॅस खरेदी खर्च वाढल्यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे एमएनजीएलकडून स्पष्ट करण्यात येत आहे. दरम्यान, येत्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅस दर आणि सरकारी धोरणांनुसार सीएनजीच्या किंमतींमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news