Maharashtra Girls Education: 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शुल्कमाफी

अभियांत्रिकी, फार्मसीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; हजारो विद्यार्थिनींना दिलासा
Maharashtra Girls Education
Maharashtra Girls EducationFile Photo
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबांतील मुलींना उच्च व तंत्रशिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 100 टक्के शिक्षण व परीक्षा शुल्कमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून दूर राहणाऱ्या हजारो मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Girls Education
Maharashtra Farm Loan Waiver: 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी सर्व बँकांच्या पीक कर्जाला लागू; मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

या योजनेअंतर्गत अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, बीबीए, बीसीए, एमसीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या पात्र मुलींना शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे तांत्रिक शिक्षण क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढत असून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

Maharashtra Girls Education
LPG Cylinder Price Hike: आखाती युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस 60 रुपयांनी महाग, व्यावसायिक सिलिंडर 114 रुपयांनी वाढ

महिलांचे शिक्षण आणि सशक्तीकरण यासाठी शासन कटिबद्ध असून ‌‘वुमन लेड डेव्हलपमेंट‌’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Girls Education
Senior Citizen Rights: आईच्या फ्लॅटमधून मुलगा-सून बेदखल; उच्च न्यायालयाने आदेश कायम ठेवला

या निर्णयामुळे राज्यातील अनेक मुलींना उच्च शिक्षणाची दारे खुली होणार असून शिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीला चालना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news