Mahavitaran Contract Workers: महावितरणच्या 1316 कंत्राटी यंत्रचालकांना 4 महिन्यांपासून पगार नाही; उपासमारीची वेळ, मोर्चाचा इशारा

राजकीय वरदहस्त असलेल्या दोन एजन्सींवर आरोप; 27 मार्चला पुढील सुनावणी, तोडगा न निघाल्यास 16 एप्रिलला प्रकाशगडावर पायी मोर्चा
Mahavitaran Contract Workers: महावितरणच्या 1316 कंत्राटी यंत्रचालकांना 4 महिन्यांपासून पगार नाही; उपासमारीची वेळ, मोर्चाचा इशारा
Published on
Updated on

मुंबई : राज्यात महावितरण या विद्युत कंपनीमध्ये यंत्रचालक (सबस्टेशन ऑपरेटर) या पदावर काम करणारे 1316 कंत्राटी वीज कामगारांना राजकीय वरदहस्त असलेल्या दोन एजन्सीनी 4 महिन्यापासून पगार दिलेला नाही.पगार थकीत राहिल्याने यंत्रचालक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी शनिवारी दिली.

Mahavitaran Contract Workers: महावितरणच्या 1316 कंत्राटी यंत्रचालकांना 4 महिन्यांपासून पगार नाही; उपासमारीची वेळ, मोर्चाचा इशारा
Maharashtra Girls Education: 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शुल्कमाफी

निलेश खरात म्हणाले,राज्यात महावितरणच्या 329 सबस्टेशनमध्ये एकूण 1316 कंत्राटी वीज कामगार म्हणून यंत्रचालक (सबस्टेशन ऑपरेटर) या जोखमीच्या पदावर कार्यरत आहेत.पाच महिन्यापूर्वी याची निविदा राजकीय वरदहस्त असलेल्या दोन एजन्सीला देण्यात आली.या निविदेमध्ये एक सुरक्षारक्षक व एक सफाई कामगार पुरवावा,असे ठरले असतांना प्रत्यक्षात ही पदे भरली नसल्याचे निविदेच्या अटी व शर्तीवरुन दिसून येत आहे.त्यांनी अटी व शर्तीचा भंग केला आहे.

Mahavitaran Contract Workers: महावितरणच्या 1316 कंत्राटी यंत्रचालकांना 4 महिन्यांपासून पगार नाही; उपासमारीची वेळ, मोर्चाचा इशारा
Maharashtra Farm Loan Waiver: 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी सर्व बँकांच्या पीक कर्जाला लागू; मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

यातील अनेकांचे भविष्य निर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजनेचे पैसे शासन दरबारी भरलेले नाही.याबाबतची रितसर तक्रार कामगार संघाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कामगार आयुक्त यांच्याकडे केली. पहिली सुनावणी 26 फेब्रुवारी 2026 ला कामगार आयुक्त कार्यालयात झाली. त्यावेळी महावितरण व एका एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. एजन्सी पगार देण्यास असमर्थ ठरत असतील तर प्रमुख म्हणून महावितरणने सर्व कामगारांना तातडीने चेकद्वारे पगार द्यावा,अशी मागणी आहे. आता पुढील सुनावणी 27 मार्च 2026 ला होणार आहे.

Mahavitaran Contract Workers: महावितरणच्या 1316 कंत्राटी यंत्रचालकांना 4 महिन्यांपासून पगार नाही; उपासमारीची वेळ, मोर्चाचा इशारा
LPG Cylinder Price Hike: आखाती युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस 60 रुपयांनी महाग, व्यावसायिक सिलिंडर 114 रुपयांनी वाढ

दरम्यान, कामगार संघाच्या या मागणीवर महावितरण प्रशासन व कामगार आयुक्त कार्यालयाने तोडगा न काढल्यास 16 एप्रिल 2026 ला कामगार आयुक्त कार्यालय ते प्रकाशगड असा पायी मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news