Mumbai News: मुंबईतील कॅब चालकाचा २२ हजार रुपयांचा विमा दावा नाकारला? कंपनीच्या धक्कादायक कारणामुळे सोशल मीडियावर संताप

मुंबईतील एका कॅब चालकाचा २२ हजार रुपयांचा विमा दावा फेटाळण्यात आला. या घटनेमुळे गिग इकॉनॉमीत काम करणाऱ्या चालकांच्या विमा संरक्षणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Mumbai cab driver
Mumbai cab driverfile photo
Published on
Updated on

Mumbai cab driver

मुंबई: मुंबईतील एका कॅब चालकाचा २२ हजार रुपयांचा विमा दावा 'अपघाताच्या वेळी लाइव्ह ट्रिप सुरू नव्हती' या कारणावरून फेटाळण्यात आला, अशी एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. या घटनेमुळे गिग इकॉनॉमीत काम करणाऱ्या चालकांच्या विमा संरक्षणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल पोस्टनुसार, संबंधित कॅब चालक दररोज सुमारे १४ तास आणि आठवड्यातील सहा दिवस काम करतो. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसादरम्यान प्रवाशाला सोडल्यानंतर तो आपल्या कारकडे परत जात असताना ओल्या प्लॅटफॉर्मवर पाय घसरून पडला. यात त्याच्या मनगटाचे हाड मोडले. उपचारासाठी त्याला २२ हजार रुपयांचा खर्च आला. चालकाकडे अ‍ॅग्रीगेटर अॅपमार्फत अपघात विमा असल्याने त्याने विमा दावा दाखल केला. मात्र, अपघाताच्या वेळी तो 'लाइव्ह ट्रिप'वर नसल्याचे कारण देत हा दावा फेटाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Mumbai cab driver
Missing Link Accident : मिसिंग लिंकवरील साखळी अपघाताने धोक्याची घंटा!

प्रवाशाला सोडल्यानंतर तो कारकडे परत चालत जात होता. त्यामुळे हा अपघात विमा संरक्षणाच्या कक्षेत येत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर चालकाने कंपनीकडे निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली. मात्र, त्याऐवजी त्याला केवळ विमा अटींची लिंक असलेला एक ई-मेल पाठविण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, घरभाडे आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी हा चालक एका हातानेच पुन्हा कामावर रुजू झाल्याचेही या पोस्टमध्ये लिहीले आहे. मात्र, या पोस्टमधील दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नसून संबंधित कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनीनेही अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

पोस्टमध्ये गिग इकॉनॉमीवरही टीका करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मसाठी प्रत्यक्ष उत्पन्न मिळवून देत असतानाच कामगारांना संरक्षण मिळते, मात्र कामाशी संबंधित इतर परिस्थितीत त्यांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा आरोप पोस्टमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीच्या धक्कादायक कारणांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

Mumbai cab driver
Vasai rain update : वसईत जोरदार पाऊस, पुराच्या पाण्यात वाहून गेल्या दोन कार
logo
Pudhari News
pudhari.news