Bread Pav Supply Mumbai: मुंबईचा ब्रेड-पाव पुरवठा धोक्यात; गॅस सिलिंडर टंचाईने बेकऱ्या अडचणीत

एलपीजी आणि पाईप गॅस पुरवठ्यात कपात; उत्पादन घटल्याने मुंबईतील सुमारे 70% ब्रेड-पाव पुरवठा खंडित होण्याची भीती
Bread Pav Supply Mumbai
Bread Pav Supply MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई शहर, उपनगरांमध्ये ठिकठिकाणी गॅस सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या असून, बुकिंग ते डिलिव्हरी कालावधी वाढवण्यात आल्याने मुंबईकरांना या रांगेतून तूर्त कोणताही दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. या टंचाईचा मोठा फटका आता मुंबईकरांच्या सकाळच्या नाश्त्याला बसेल. ज्याशिवाय मुंबईकरांची सकाळ सुरू होत नाही त्या ब्रेड-पावचाच पुरवठा धोक्यात आला असून, मुंबईचा 70% पुरवठा खंडित होण्याची भीती आहे.

Bread Pav Supply Mumbai
Swachh Maharashtra scam: स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 12 हजार कोटींचा घोटाळा

इंडिया बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष खोदादा इराणी यांनी सांगितले की, मुंबईतील बहुतांश बेकऱ्या एलपीजी सिलिंडरवरच चालतात. 350 मोठ्या बेकऱ्यांपैकी 80 टक्के बेकऱ्या व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरतात. 20% बेकऱ्यांकडे व्यावसायिक पीएनजी म्हणजे पाईप गॅस आहे. यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबला असून, व्यावसायिक पाईप गॅस पुरवठ्यातही कपात करण्यात येत आहे. उर्वरित बेकऱ्या पारंपरिक शेगड्या वापरत असल्या तरी त्यांची पुरवठा क्षमता अगदीच कमी आहे.

मुंबईतील 800 पैकी 450 बेकऱ्या उपनगरांमध्ये असून त्या सरपणावर चालणाऱ्या शेगड्या वापरतात. या बेकऱ्यांमधून मुंबईला फक्त 30 टक्के पुरवठा होतो.

Bread Pav Supply Mumbai
LPG Supply Maharashtra: एलपीजी पुरवठ्यात शाळा आणि रुग्णालयांना प्राधान्य; उत्पादन दोन दिवसांत ११ हजार मेट्रिक टनांवर

सिलिंडर आणि पाईप गॅस पुरवठ्यात कपात झाल्याने बेकऱ्यांचे ब्रेड आणि पावचे उत्पादन कमालीचे घटले असून, त्याचा थेट फटका मुंबईकरांना होणाऱ्या पुरवठ्याला बसू लागला आहे. ज्या बेकऱ्यांमध्ये जुन्या चुली अजूनही आहेत त्या सुरू करण्याची परवानगी मागण्याचा प्रयत्न एका बेकरी चालकाने महापालिकेकडे केला असता मुंबईतील भयंकर प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर त्यास कायदेशीर सल्ला घेण्याचा रस्ता महापालिकेने दाखवला.

Bread Pav Supply Mumbai
Chandrkant Patil | विद्यार्थिनींकडून फी घेणार्‍या महाविद्यालयांची मान्यता रद्द करणार

वडापावचे काय?

वडापाव आणि मुंबईकर हे समीकरणही सिलिंडर टंचाईने धोक्यात आले आहे. लालबागच्या लाडूसम्राटचे उदाहरण घेऊ. एक हजार स्क्वेअर फूट जागेत सकाळी 7 पासून दिवसभर दहा हजार वडापाव आणि साबुदाणा वडा विकणाऱ्या या लाडूसम्राटचे शटर बंद झाले आहे. त्यांना रोज सहा सिलिंडर लागतात. गुरुवारपर्यंत कसे तरी भागले आणि शुक्रवारी शटर बंद करावे लागले. संपूर्ण मुंबईतील छोट्या-मोठ्या हॉटेलांची हीच स्थिती झालेली दिसते. दादरचे आदर्श उपाहारगृह मंगळवारपासूनच बंद झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news