Mumbai Narcotics Smuggling Network: मुंबईत अमली पदार्थ विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर; पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढल्याचा आरोप

बोरिवली-दहिसरमधील कथित नेटवर्कचा पोलिसांकडून तपास; सासू-सुनेला अटक, १० ते १५ वर्षांच्या मुलांचा वापर केल्याचा संशय
Mumbai Narcotics Smuggling Network
Mumbai Narcotics Smuggling NetworkPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे विस्तारण्यासाठी तस्करांकडून आता अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. गरिबी, कौटुंबिक अडचणी, आजारपण आणि पैशांची चणचण यांचा गैरफायदा घेत या मुलांना ड्रग्जच्या व्यवसायात ओढले जात आहे.

हेरॉईनच्या १०० पुड्यांची विक्री करून दिल्यास एक हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून मुलांना वाहक म्हणून वापरले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बोरिवली-दहिसर परिसरात हेरॉईन विक्रीचे कथित नेटवर्क चालविणाऱ्या ६० वर्षीय महिलेने आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांतील मुलांना पैशांचे आमिष दाखवून ड्रग्ज विक्रीसाठी वापरल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सासू आणि सुनेला अटक केली आहे. रेहाना अब्दुल हमीद मुलानी ऊर्फ रॅलिअप्पा (६०) आणि फरीदा मुलानी (३२) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

Mumbai Narcotics Smuggling Network
Decline in overseas education: भारतीय विद्यार्थ्यांची परदेशी शिक्षणाकडे पाठ; दोन वर्षांत २.८२ लाख विद्यार्थ्यांची घट

रेहाना ही या नेटवर्कची मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिचे दोन मुलगे आणि नातवाच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, रेहाना हिच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यापैकी चार गुन्हे अमली पदार्थ विक्रीशी संबंधित आहेत. २००८ पासून ती अमली पदार्थांच्या व्यवसायात सक्रिय असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Mumbai Narcotics Smuggling Network
Wadala Bus Accident: भक्ती पार्क येथे विचित्र अपघात; पाच प्रवासी गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना लक्ष्य करीत होती. ज्या घरात उपचारांसाठी पैसे उभे करणे कठीण जात आहे, अशा कुटुंबांशी संपर्क साधला जात असे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हेरॉईनच्या सुमारे १०० छोट्या पुड्यांचे एक बंडल विक्री केल्यास संबंधित मुलांना एक हजार रुपये दिले जात होते. म्हणजेच, काही हजार रुपयांच्या गरजेसाठी मुलांना अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात ढकलले जात असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

दहा ते पंधरा वर्षांच्या मुलांचा वापर?

बोरिवली परिसरातील दौलतनगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या झोपडपट्ट्या तसेच बोरिवली आणि दहिसर पूर्वेकडील काही भागांत ही मुले सक्रिय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लहान मुलांवर पोलिसांचे लक्ष तुलनेने कमी जाते, त्यांच्या हालचालींवर संशय घेतला जात नाही, या परिस्थितीचा फायदा तस्कर घेत असल्याचा संशय आहे.

त्यामुळे मुलांचा वापर केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुड्या पोहोचविण्यासाठी नव्हे, तर ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठीही केला जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.