Wadala Bus Accident: भक्ती पार्क येथे विचित्र अपघात; पाच प्रवासी गंभीर जखमी

भक्ती पार्क सिग्नलवरील साखळी अपघातात दोन कारचे मोठे नुकसान; कारमधील पाळीव कुत्राही जखमी
accident
accidentFile Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: वडाळा येथील भक्ती पार्क सिग्नलवर सोमवारी रात्री ९ च्या सुमारास एक भीषण साखळी अपघात झाला. एका खासगी ऑपरेटरच्या 'चलो' बसने सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना पाठीमागून जोरात धडक दिल्याने दोन कारचा चक्काचूर झाला असून ५ प्रवासी गंभीर जखमी झाले. तसेच कारमधील एक पाळीव कुत्राही जखमी झाला आहे.

बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा डेपोची बेस्ट बस कुलाबा येथून गवानगावच्या दिशेने जात होती. ही बस भक्ती पार्क वाहतूक सिग्नलजवळ थांबली असता, तिच्या मागे इतर दोन चारचाकी वाहनेही सिग्नलमुळे उभी होती.

त्याच वेळी मागून येणाऱ्या एका खासगी ऑपरेटरच्या 'चलो' बसने सर्वात मागे असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही कार एकमेकांवर आदळल्या आणि त्यातील पहिली कार थेट पुढे उभ्या असलेल्या बेस्ट बसच्या मागच्या भागाखाली घुसली. दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे प्रवासी वाहनांमध्येच अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सर्व ५ जखमींना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक पूर्ववत केली.

जखमींची नावे

शिवानी पाल (वय ६३ वर्षे) : डोक्याला गंभीर दुखापत (प्रकृती चिंताजनक) हसन शेख (वय ३३ वर्षे) : डोक्याला गंभीर दुखापत (प्रकृती चिंताजनक)गणेश इंद्रपाल (वय ७५ वर्षे) : डोक्याला आणि छातीला दुखापत, मधू पाल (वय २८ वर्षे) : डोक्याला आणि डाव्या हाताला दुखापत, बालाजी पांडुरंग (वय ३७ वर्षे) : डाव्या हाताला दुखापत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.