Decline in overseas education: भारतीय विद्यार्थ्यांची परदेशी शिक्षणाकडे पाठ; दोन वर्षांत २.८२ लाख विद्यार्थ्यांची घट

२०२३ मध्ये ९.०८ लाख विद्यार्थी परदेशात गेले; २०२५ मध्ये ही संख्या ६.२६ लाखांवर आली. वाढता खर्च आणि व्हिसा नियमांतील बदल ही प्रमुख कारणे.
Indian Students Studying Abroad
Indian Students Studying AbroadPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: परदेशातील शिक्षणासाठी वाढणारा खर्च, विद्यार्थी व्हिसा आणि स्थलांतरविषयक नियमांमधील बदल, विविध देशांतील भू-राजकीय अस्थिरता तसेच परदेशी विद्यापीठांनी भारतात सुरू केलेले शैक्षणिक अभ्यासक्रम या घटत्या संख्येमागील प्रमुख कारणे ठरत आहेत.

त्यामुळे परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याऐवजी भारतातील शैक्षणिक संस्थांना पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ९ लाख ८ हजार होती. २०२४ मध्ये ही संख्या घटून ७ लाख ७० हजार झाली.

२०२५ मध्ये आणखी घट नोंदवली गेली असून, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ लाख २६ हजारांवर आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत २ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांची घट झाली आहे.

Indian Students Studying Abroad
Wadala Bus Accident: भक्ती पार्क येथे विचित्र अपघात; पाच प्रवासी गंभीर जखमी

परदेशातील शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याबरोबरच शिक्षणानंतर तेथे नोकरी मिळविण्याच्या संधी हा भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निकष असतो. मात्र, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी विद्यार्थी व्हिसा आणि स्थलांतरविषयक नियम अधिक कठोर केले आहेत.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्यासाठी मिळणाऱ्या परवानगीवरही विविध मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे परदेशात शिक्षण घेऊन तेथेच करिअर करण्याच्या नियोजनावर परिणाम होत आहे.

Indian Students Studying Abroad
Mumbai Water Stock: तलावांतील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर; पाणीकपातीत वाढ होण्याची शक्यता

परदेशी शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या बदलत्या भूमिकेचे चित्र ‘एमेरिटस’च्या ‘इंडिया जनरेशन झेड आउटलुक २०२६’ या अहवालातूनही स्पष्ट झाले आहे. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार केलेल्या ४८ टक्के विद्यार्थ्यांचा मागील वर्षभरात परदेशात जाण्याबाबतचा कल कमी झाला आहे.

तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या ६९ टक्के विद्यार्थ्यांनी व्हिसासंबंधित अनिश्चितता टाळण्यासाठी भारतातील आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांना पसंती दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

परदेशात शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च, निवासाची व्यवस्था आणि सुरक्षिततेचे प्रश्न लक्षात घेता भारतातील उच्च शिक्षणाचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत. परदेशी विद्यापीठांनी भारतात सुरू केलेले अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य आणि देशातील उच्च शिक्षण संस्थांचा वाढता विस्तार यामुळे विद्यार्थ्यांना देशात राहूनही आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएस) यांसारख्या संस्थांनी जागतिक क्रमवारीत मिळवलेले स्थान आणि शैक्षणिक गुणवत्तेतील सुधारणा यांचाही विद्यार्थ्यांच्या निवडीवर परिणाम होत असल्याचे उच्च शिक्षणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.