Tree Trimming Mumbai
मुंबई : मुसळधार पावसामुळे धोकादायक झाडे कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या वृक्षछाटणी मोहीमेत आतापर्यंत सुमारे 95 हजार 205 झाडांच्या फाद्यांची छाटणी करण्यात आल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाने सांगितले.
मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रस्त्यांवर सुमारे 1 लाख 86 हजार 246 झाडे आहेत. यापैकी 707 झाडे ही मृत, धोकादायक आणि वाकलेल्या अवस्थेत होती. पावसात ती कधीही कोसळून अपघाताची भिती होती. यासाठी महापालिकेने वार्डनिहाय कंत्राटदारांची नियुक्ती करीत या धोकादायक झाडांची विल्हेवाट तर इतर झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे.
मुंबईतील 1 लाख 49 हजार 801 झाडांचे सर्वेक्षण केले होते. यापैकी 1 लाख 10 हजार 771 झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. तर खासगी, सरकारी जागेवरील 10 हजार 384 झाडांच्या फाद्या छाटल्या आहेत.