BMC bribery case : विभाग कार्यालयात लाचखोर अभियंत्याला अटक

क्लाऊड किचनसाठी लागणार्‍या परवानगीसाठी लाचेची मागणी
BMC bribery case
राधेश्याम विजयप्रसाद जयस्वालpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : क्लाऊड किचनसाठी लागणार्‍या परवानगीसाठी लाचेची मागणी करणे ए वार्डच्या महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता राधेश्याम विजयप्रसाद जयस्वाल यांना चांगलेच महागात पडले. बुधवारी सायंकाळी त्यांना त्यांच्याच कार्यालयात वीस हजाराची लाचेची रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी एक मोबाईलसह सात लाखांची कॅश हस्तगत केली आहे. या कॅशबाबत त्यांची लवकरच चौकशी होणार आहे. यातील तक्रारदार महिलेने तिच्या राहत्या घरी घरगुती जेवणाच्या (क्लाऊड किचन) व्यवसायासाठी काही परवानगी मिळावी यासाठी ए वॉर्डमध्ये अर्ज केला होता.

BMC bribery case
Mumbai OC Abhay Yojana : १९ हजार इमारतींना ओसी मिळणार

याच अर्जासंदर्भात ती तेथील दुय्यम अभियंता राधेश्याम जयस्वाल यांना भेटण्यासाठी गेली होती. यावेळी परवानगी देण्यासाठी त्यांनी तिच्याकडे सव्वालाखांची मागणी केली होती. राधेश्याम जयस्वाल यांनी तिच्याकडे लाचेची मागणी करुन वीस हजार रुपये बक्षीस स्वरुपात घेण्याचे मान्य केले होते.ही लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या घटनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिपीका डंगारणे, दयानंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी ए वॉर्ड विभागात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदार महिलेकडून वीस हजाराची बक्षिस स्वरुपात लाच घेताना या पथकाने रंगेहाथ अटक केली.

BMC bribery case
Jambarung Dam project : ५० वर्षांनंतरही जांबरुंग धरणाचे काम कागदावरच

कारवाईनंतर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांत खळबळ

त्यांच्या कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडील मोबाईलसह सात लाख तीन हजार साठ रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत गुरुवारी दुपारी त्यांना विशेष सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. या कारवाईने तिथे उपस्थित पालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news