Mumbai Crime: मध्यरात्री मेसेज, नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल आणि अश्लील हावभाव; मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

Mumbai BJP Sexual Harassment Case: मुंबईतील भाजप पदाधिकारी युसूफ रंगवाला यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai BJP Sexual Harassment Case
Mumbai BJP Sexual Harassment CasePudhari
Published on
Updated on

Mumbai BJP Sexual Harassment Case: भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यावर लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 224 चे अध्यक्ष युसूफ रंगवाला यांच्याविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार महिलेच्या आरोपानुसार, युसूफ रंगवाला यांनी मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास महिलेला मोबाईलवर मेसेज पाठवून "एका तासासाठी घरी येऊ का?" अशी विचारणा केली. महिलेने त्यास नकार दिल्यानंतरही त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.

तक्रारीनुसार, त्यानंतर आरोपीने महिलेला व्हिडिओ कॉल केला. या व्हिडिओ कॉलदरम्यान तो नग्न अवस्थेत होता आणि अश्लील हावभाव तसेच अशोभनीय कृत्य करत असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.

Mumbai BJP Sexual Harassment Case
Mumbai News: 'मुलीला पाठव, कर्ज माफ करतो', परप्रांतीय रिकव्हरी एजंटची अश्लील मागणी; कर्जवसुलीच्या नावाखाली मराठी महिलेचा छळ

महिलेच्या तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी संबंधित प्रकरणाची दखल घेत युसूफ रंगवाला यांच्याविरोधात लैंगिक छळासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित पुरावे आणि तांत्रिक माहितीची पडताळणी केली जात आहे.

Mumbai BJP Sexual Harassment Case
Mumbai News: गुजरातमधील ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची कारवाई

दरम्यान, या आरोपांबाबत आरोपी किंवा त्यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news