Beed Crime | पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Beed Crime | पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Beed Crime
Beed Crimepudhari photo
Published on
Updated on

केज -तालुक्यात पुन्हा एक नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लहान मुलाला मोबाईल खेळायला देऊन, सावत्र पित्याने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक आणि नात्याला काळिमा फासणारी निंदनीय घटना केज शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

केज शहरात वास्तव्यास असलेल्या पीडित १३ वर्षीय मुलीच्या आईने दोन मुली झाल्या नंतर पती सोबत जमत नसल्यावरून नऊ वर्षांपूर्वी वेगळे झाली. आठ वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगा झाला. पीडित मुलगी ही आई व आईने केलेल्या दुसऱ्या पती सोबत एकत्र राहतात. तिची आई ही ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता माहेरी गेली.

Beed Crime
Beed OBC Census Boycott Warning |ओबीसी संघटनांचा जनगणनेवर बहिष्काराचा इशारा

तर पीडित मुलगी ही एकटीच घरी होती. दुपारी १२.३० सावत्र पित्याने घरी येऊन पीडित मुलीला आई कुठे गेली? अशी विचारणा केली. तिने गावाकडे गेलेल्या आईला फोन करून कधी येणार आहेस, असे विचारले. मात्र आईने वेळ लागेल असे सांगितले. हीच संधी साधून सावत्र पित्याने साडेतीन वर्षांच्या मुलाला मोबाईल देऊन खाली बसविले. पीडित मुलीला कॉटवर बसवून तिच्या सोबत लज्जास्पद चाळे करू लागल्याने मुलीने विरोध केला. आईला सांगेन असे म्हणाली, तरी आईला सांगायचे नसते. आमच्या भांडणे होतील. असे म्हणत या सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. आई घरी आल्यानंतर मुलगी रडत वसलेली पाहून विचारणा केली. ती घाबरलेली काहीही सांगत नव्हती. आईने परत परत विचारणा करीत विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर तिने तिच्या सोबत झालेल्या प्रकाराची माहिती सांगितली.

Beed Crime
Beed Fire : बीडमध्ये आगीचे तांडव! शॉर्टसर्किटने घर,गोठा जळून खाक; कुत्र्यासह वासराचा होरपळून मृत्यू

१२ एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सावत्र पित्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news