Mumbai News: 'मुलीला पाठव, कर्ज माफ करतो', परप्रांतीय रिकव्हरी एजंटची अश्लील मागणी; कर्जवसुलीच्या नावाखाली मराठी महिलेचा छळ

कर्जवसुलीच्या नावाखाली एका परप्रांतीय रिकव्हरी एजंटकडून मराठी महिलेचा मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंधेरी येथे उघडकीस आली आहे.
Mumbai Andheri recovery agent harassment
Mumbai Andheri recovery agent harassmentAI Photo
Published on
Updated on

Mumbai Andheri recovery agent harassment

मुंबई: कर्जवसुलीच्या नावाखाली एका परप्रांतीय रिकव्हरी एजंटकडून मराठी महिलेचा मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंधेरी येथे समोर आली आहे. "तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, तुझे कर्ज माफ करतो," असे म्हणत एजंटने पीडित महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलने केला आहे.

नातेवाईकांना धमक्या आणि गोपनीयतेचा भंग

कर्ज वसुलीसाठी एका नामांकित फायनान्स कंपनीशी संबंधित असलेल्या या एजंटकडून सातत्याने अश्लील भाषेचा वापर केला जात होता, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. एवढेच नव्हे तर, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना वारंवार फोन करून धमकीचे संदेश पाठवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, या एजंटने महिलेच्या नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक माहिती बेकायदेशीरपणे मिळवून गोपनीयतेचा भंग केला. यामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आहे.

Mumbai Andheri recovery agent harassment
Kolhapur Crime | व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर चौघांकडून आठ महिने अत्याचार, मुरगूड पोलिसांत गुन्हा!

मनसे आक्रमक; पोलिसांना आंदोलनाचा इशारा

या जाचाला कंटाळून पीडित महिलेने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे (मनसे) धाव घेतली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी पोलिसांत धाव घेत संबंधित एजंट आणि फायनान्स कंपनीविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "परप्रांतीय एजंटकडून मराठी महिलांचा असा छळ खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांनी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा इशारा देसाई यांनी पोलिसांना दिला आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरू

संबंधित एजंटच्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, सध्या तक्रारीची पडताळणी केली जात आहे. दोषी एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Andheri recovery agent harassment
लाडकी बहीण योजनेत केवायसीच्या नावाखाली किळसवाणा प्रकार; महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट तयार करून पाठविले अश्लील व्हिडिओ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news