Mumbai AQI : मुंबईचा सरासरी एक्यूआय शंभरच्या खाली आला

24 तारखेला 172 असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक 26 तारखेला थेट 86 वर आला
Mumbai AQI
Mumbai AQI Pudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई व उपनगरांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शंभराच्या आत आल्याने वायू प्रदूषणामध्ये घट झाली आहे. गेले तीन दिवस एक्यूआयचे प्रमाण उतरत्या क्रमांकाने आहे. 24 तारखेला 172 असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक 26 तारखेला थेट 86 वर आला आहे.

Mumbai AQI
Love Jihad law : राज्यात लव्ह जिहादविरोधी कायद्याची तयारी

50 ते 100 पर्यंतचा एक्यूआय हा प्रदूषणाच्या मध्यम कॅटेगरीमध्ये मोडतो. प्रदूषणातील घट पाहता मुंबईकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. गावदेवी (64), वांद्रे पश्चिमसह ब्रीच कँडी (73), कुलाबा (75) तसेच परळ भोईवाडा (81), कलेक्टर कॉलनी आणि गावठाण, चेंबूर (84), भांडूप पश्चिम आणि बोरिवली पूर्व (86) परिसरात सर्वात कमी प्रदूषण आढळून आले.

Mumbai AQI
Shambhuraj Desai : घरखरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news