Mumbai Rickshaw Driver: मुंबईतील रिक्षाचालक महिन्याला कमवतो 5-8 लाख

Rahul Rupani Product Leader Lenskart Linkedin Post: बंगळुरूच्या एका उद्योजकाने सोशल मीडियावर केला दावा
Mumbai Rickshaw Driver Earning 5 to 8 Lakhs Per Month
Mumbai Rickshaw Driver Earning 5 to 8 Lakhs Per MonthPudhari
Published on
Updated on

Mumbai Auto Rickshaw Driver Income

मुंबई : मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर एक ऑटो चालक दरमहा 5 ते 8 लाख कमावत असल्याचा दावा बंगळुरूच्या एका उद्योजकाने सोशल मीडियावर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. व्हेन्यूमाँकचे सह-संस्थापक राहुल रुपाणी यांनी ‘लिंक्डइन’वर पोस्ट शेअर करत असा दावा केला आहे की, ऑटोचालक अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर पर्यटकांचे सामान सुरक्षित ठेवतो आणि या सेवेसाठी तो 1,000 आकारतो. त्यामुळे तो गाडी न चालवताही दरमहा 5 ते 8 लाख रुपये कमवतो.

रुपाणी यांनी पुढे सांगितले की, त्या ऑटो ड्रायव्हरने जवळच एक लहान लॉकर स्पेस असलेल्या स्थानिक पोलीस अधिकार्‍यासोबत भागीदारी केली आहे. तो वाणिज्य दूतावासातील अभ्यागतांकडून गोळा केलेल्या सर्व बॅगा त्या लॉकरमध्ये ठेवतो आणि बहुतेक लोक अमेरिकन व्हिसा, मुलाखतींसाठी घाम गाळत असताना, हा माणूस शून्य-मैल, अति-नफा देणारा व्यवसाय चालवतो.

Mumbai Rickshaw Driver Earning 5 to 8 Lakhs Per Month
Mumbai News | नदी, नालेसफाई 82.31 टक्केच

रुपानी यांनी पोस्ट शेअर केल्याबद्दल काहींनी त्यांचे कौतुक केले, तर काहींनी शंका आणि प्रश्न उपस्थित केले. एका व्यक्तीने पोस्ट केले, हे त्याच्या कमाईमध्ये पोलिसांसह अनेकांचा वाटा असेल, मग एवढे उत्पन्न त्याचे एकट्याचे कसे? तसेच, वाणिज्य दूतावासात 500 रुपयांच्या शुल्कात लॉकर सुविधा आहे. मग लोक त्याला पैसे देऊन ही सेवा का घेतात?

Mumbai Rickshaw Driver Earning 5 to 8 Lakhs Per Month
Social Media Post | रिल स्टार्सना सुगीचे दिवस; एका व्हिडिओसाठी पाच हजार मानधन

दुसर्‍याने पुढे म्हटले की, लोक त्यांच्या सुरक्षिततेची खात्री बाळगून विश्वासाने त्यांच्या बॅगा आणि सामान त्याच्याकडे ठेवतात. अनोळखी लोकांचा विश्वास संपादन करणे हे काही छोटेसे काम नाही. हे खरोखरच प्रभावी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news