Social Media Post | रिल स्टार्सना सुगीचे दिवस; एका व्हिडिओसाठी पाच हजार मानधन

Reel Stars : महागड्या कॅमेऱ्यांची जागा मोबाइलने घेतली
social media campaigning
उमेदवारांचा हायटेक प्रचार पुढारी
Published on
Updated on

नाशिक : पारंपरिक प्रचाराची माध्यमे बदलून, आधुनिक पद्धतीने केलेला प्रचार अधिक प्रभावी होत असून, एका क्लिकवर लाखो मतदारांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होत असल्याने, उमेदवार अत्यंत हटके पद्धतीने प्रचारात रंगल्याचे दिसून येत आहेत. सोशल मीडियाच्या युगात 'रिल' हा प्रकार अत्यंत लोकप्रिय असल्याने त्याचाच वापर उमेदवार करीत आहेत. शहर व परिसरात असलेल्या रिल स्टार्सच्या मदतीने आपली प्रतिमा लाखो मतदारांपर्यंत पोहोचविली जात आहे. यासाठी या स्टार्सनाही पैसे मिळत असल्याने जणू काही त्यांना सुगीचेच दिवस आले आहेत. (Since 'reel' is very popular in the age of social media, candidates are using it for assembly elections)

शहर व परिसरात असलेल्या रिल स्टार्सच्या फॉलोअर्सची संख्या लाखात आहेत. शिवाय त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेल्या रिलला हजारो लाइक्स मिळत असल्याने, उमेदवार या रिल स्टार्सना सोबत घेऊन प्रचार करताना दिसून येत आहेत. रिल स्टार्ससोबत झळकून उमेदवार आपले व्हिजन सांगत आहेत. याशिवाय मलाच मतदान करा, असे आवाहनही करताना रिलमध्ये दिसत आहेत. सध्या फेसबुकसह व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपवर रिल स्टार्ससोबतचे उमेदवारांचे व्हिडिओ शेअर केले जात असून, त्यास लाइक्सही चांगल्या मिळत आहेत. मात्र, व्हर्च्युअल मिळत असलेल्या लाइक्सचे मतांमध्ये रूपांतर होणार काय, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान, उमेदवारांच्या रिल्सचे काम मिळत असल्याने, त्यातून या रिल स्टार्सना चांगले पैसे मिळत आहेत. एका रिलसाठी पाच हजार व त्यापेक्षा अधिक मानधन आकारले जात असल्याने, सध्या या रिल स्टार्सना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीत मोबाइलचा वापर

पूर्वी फोटो अथवा व्हिडिओ शूट करण्यासाठी महागड्या कॅमेऱ्यांचा वापर केला जात असे. मात्र, आता मोबाइलच्या सहाय्यानेच फोटो अथवा व्हिडिओ काढले जात आहेत. मोबाइलवरच रिल तयार करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. महागड्या कॅमेऱ्यांची जागा मोबाइलने घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news