Mumbai Airport Gold Smuggling: दूध पावडर, ओट्सच्या पाकिटांत लपवले १४.८१ कोटींचे सोने; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

तिघांवर ‘डीआरआय’ची कारवाई; खाद्यपदार्थांमध्ये सोन्याची भुकटी
Navi Mumbai international flights
Navi Mumbai Airportpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: दूध पावडर, ओटस्‌, विविध प्रकारचे पीठ, न्यूटेला आणि नारळाच्या दुधाची पावडर पाहता साधे खाद्यपदार्थ वाटावेत, अशा पॅकेटमध्ये सोन्याची भुकटी मिसळून तस्करी करण्याचा प्रकार मुंबई विमानतळावर उघडकीस आला आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाने दुबईहून आलेल्या तीन भारतीय प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्या सामानातून ९.४० किलो विदेशी सोने जप्त केले. या सोन्याची किंमत सुमारे १४.८१ कोटी रुपये आहे.

Navi Mumbai international flights
Samruddhi Expressway Expansion: विदर्भासाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्गाच्या विस्ताराला वेग; ४६ हजार कोटींचे ४ महामार्ग

डीआरआयच्या मुंबई विभागाला मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या सहकार्याने दुबईहून आलेल्या तिघांना रोखण्यात आले.

३३.५० किलो खाद्यपदार्थांत सोन्याची भुकटी

तिघांच्या सामानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना संशयास्पद वस्तू आढळल्या. त्यानंतर बारकाईने तपासणी केली असता सोन्याचे रूपांतर बारीक भुकटीत करून ते खाद्यपदार्थांमध्ये मिसळल्याचे आढळले.

Navi Mumbai international flights
Mumbai Noise Pollution: मुंबईतील विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण; वांद्रे, वरळीत १०७ डेसिबलपर्यंत आवाज

सोन्याची भुकटी ज्या पदार्थांमध्ये मिसळण्यात आली होती, त्यांचा रंग, पोत आणि स्वरूप सोन्याच्या भुकटीशी साधर्म्य राखणारे होते. त्यामुळे नियमित तपासणीत हा प्रकार लक्षात येऊ नये, यासाठी ही पद्धत वापरण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एकाच तस्करी टोळीशी संबंध उघड

चौकशीदरम्यान तिन्ही प्रवाशांनी आपण एकाच संघटित सोन्याच्या तस्करीच्या टोळीसाठी काम करत असल्याचे मान्य केल्याची माहिती ‘डीआरआय’ने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news