Mumbai Airport Gold Smuggling Case: मुंबई विमानतळावर ५ कोटींचे सोने जप्त; भाजप पदाधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

संशयितांचे बँक व्यवहार, परदेश दौरे आणि कॉल डिटेल्स तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Mumbai Airport Gold Smuggling Case
Mumbai Airport Gold Smuggling CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तब्बल पाच कोटींचे सोने शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास जप्त करून सहाजणांना अटक केली. यामध्ये भाजप कामगार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.

अजित आचरेकर, रोहित कुमार सिंग, संतोष सुभाष, समीमुल्ला शहा, हमीद लेबेरीफखान, फलिल मोहम्मद कासिम अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयास्पद हालचालींवरून या सहाजणांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत त्यांची सखोल झडती घेतली असता हा कोट्यवधी रुपयांच्या सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला. संशयितांचे बँक व्यवहार, परदेश दौरे आणि कॉल डिटेल्स तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Mumbai Airport Gold Smuggling Case
Bank Fraud Lalbaug: बँक कारकुनाचा कावा, खातेदारांच्या एफडी तारण ठेवून उचलले कर्ज; जी. एस. सहकारी बँकेतील प्रकार

या कारवाईत या अधिकार्‍यांनी ३११८ ग्रॅम वजनाचे विदेशातून आणलेले सोने जप्त केले आहे. विमानतळावरील काही कर्मचारी विदेशातून आणलेल्या सोन्याच्या तस्करीच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्‍यांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी प्रत्येक संशयित कर्मचार्‍यावर लक्ष केंद्रीत केले होते. ही मोहीम सुरु असताना या अधिकार्‍यांनी विमानतळाजवळील हॉटेलजवळ सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले होते.

अजीत आचरेकर, रोहितकुमार सिंग आणि संतोष पोल यांचा समावेश होता. ते तिघेही आंतररराष्ट्रीय विमानतळावर एका खाजगी कंपनीत कामाला होते. या तिघांनी एक बॅग समीउल्लाला दिली होती. या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना तीन कॅप्सुलमधील मेण स्वरुपातील सोने दिसून आले.

चौकशीत दोन श्रीलंकन आणि एक बांगलादेशी नागरिकांनी दुबई आणि बँकॉंक येथून ते सोने आणून संबंधित आरोपींना विमानतळाबाहेर आणून देण्यासाठी दिले होते. त्यांच्या चौकशीतून या तिघांचे नावे समोर आले होते. त्यानंतर या पथकाने हमीद खान, फलील कासिम आणि मोहम्मद कावसार या तिघांना ताब्यात घेतले होते. तपासात त्यांनी हे सोने आणल्याची कबुली दिली.

Mumbai Airport Gold Smuggling Case
Kandivali DP Road: कांदिवली डीपी रोडवरून श्रेयवाद; केंद्रीय मंत्र्यांसमोर आमदारांची भाषणात चढाओढ, कार्यकर्ते भिडले

या सर्वांविरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आचरेकर भाजपचा पदाधिकारी

या कारवाईत अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी आचरेकर हा भाजपच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेत चिटणीस म्हणून कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news