

मुंबई : सुमारे 79 कोटींच्या कोकेनसह दोन महिला प्रवाशांना सीमा शुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या महिलांकडून या अधिकार्यांनी 7950 ग्रॅम वजनाचे कोकेनचा साठा जप्त केला आहे. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर या दोघींनाही किल्ला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बँकाँकहून काही प्रवाशी कोकेन घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी बँकाँकहून आलेल्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी विमानतळाबाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन महिलांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेची तपासणी करताना या अधिकार्यांना त्यांच्या सामानात खेळण्याच्या पाकिटात 22 विटांच्या आकाराची पांढर्या रंगाची पाडवर सापडली होती.
एचडीपीएस फिलड किटसह या पावडरची चाचणी घेण्यात आली होती. त्यात ती पावडर कोकेन असल्याचे उघडकीस आले. तपासात त्यांना ते कोकेन बँकाँक येथे एका व्यक्तीने दिले होते. ते पार्सल त्यांना मुंबई विमानतळाबाहेर एका व्यक्तीला द्यायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना अटक केली. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वर्षातील मोठी कारवाई
7 किलो 950 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 79 कोटी रुपये इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्तीची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही या वर्षातील पहिलीच मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.