मुंबई : छेडा नगर जंक्‍शन जवळ चालत्‍या मोटारीला भीषण आग

मुंबई : छेडा नगर जंक्‍शन जवळ चालत्‍या मोटारीला भीषण आग
Published on
Updated on

घाटकोपर ; पुढारी वृत्‍तसेवा 

पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर पूर्व छेडा नगर जंक्शन येथे एका एर्टीगा गाडीला आज (मंगळवार) भीषण आग लागली. या मुळे या मार्गावर ठाण्याकडे जाणारी वाहतूक सुमारे अर्ध्या तासासाठी विस्कळीत झाली होती.

या विषयी अधिक माहिती अशी की, अंटोप हिल येथून रियाज सुलतान शेख हे आपल्या चार नातेवाईकांसह ठाण्याच्या दिशेने त्यांच्या या एर्टीगा मोटारकार मधून निघाले होते. मात्र छेडा नगर जंक्शन जवळ येत असताना अचानक त्यांच्या मोटार कार मधून धूर येऊ लागला. त्यांनी समय सुचकता दाखवत गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि गाडीतून सर्वांनी पळ काढला. काही क्षणातच गाडीने पेट घेतला आणि अर्धा तासांपर्यंत ही गाडी जळत होती.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, पंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच काही क्षणात त्यांनी या गाडीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवीत आग विझवली. ही नवी कोरी एर्टीगा मोटार कार तीनच महिन्यांपूर्वी रियाज यांनी विकत घेतली होती, त्यामुळे त्यांना ही आग लागल्याने धक्का बसला आहे. सुदैवाने या आगीत कोणी जखमी झाले नसले तरी ही मोटार कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news