Mumbai Tree Cutting : मुंबईकर ५० वर्षे जुनी ३४२ झाडे गमावणार

आज वृक्ष प्राधिकरणात झाडांचे भवितव्य ठरणार
Mumbai Tree Cutting
Mumbai Tree Cuttingpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : राजेश सावंत

मुंबई शहरातील विविध प्रकल्पांतर्गत ३४२ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास मुंबईकर ३४२ झाडे गमावणार आहेत. यात ४० ते ५० वर्षे जुन्या झाडांचा समावेश आहे.

झाडे लावा.. झाडे वाचवा.. असा संदेश देणारी मुंबई महानगरपालिका विविध विकास कामांसाठी शेकडो झाडे कापण्यास परवानगी देत आहे. विकासाच्या नावाखाली मुंबईत झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून यात जुन्या झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

Mumbai Tree Cutting
Mumbai Water Cut : मुंबईत पाणीबाणी!

अंधेरी पूर्वेकडील एका रहिवासी इमारतीच्या बांधकामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या ६० झाडे, वांद्रे पूर्व येथे गांधीनगर नवरत्न सोसायटीच्या इमारतीसाठी ७२, धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत २० मीटर रुंद रस्त्याच्या कामात येणारी ७५ तर धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वाहन मार्गीगेच्या कामात येणारी १३५ अशी ३४२ झाडे हटवण्यात येणार आहेत. यात १४४ झाडे पूर्णपणे कापली जाणार असून उर्वरित झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पण पुनर्रोपित केलेली झाडे जगणार का, असा सवाल करण्यात येत आहे.

झाडे हटवण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शुक्रवारी प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्राधिकरण काय निर्णय घेणार यावर झाडांचे भवितव्य अवलंबून आहे. कापण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावण्याची अट असली तरी, यातील किती झाडे जगतात याची आकडेवारी मुंबई महापालिकेकडे नाही. नियमानुसार कापलेल्या झाडांच्या बदल्यात देशी झाडे लावणे बंधनकारक आहे. परंतु देशी झाडे लावण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

Mumbai Tree Cutting
LPG Gas Delivery OTP Problem : ओटीपीच्या कचाट्यात गॅस ग्राहकांची ससेहोलपट

कोणती झाडे कापणार

नारळ, आंबा, चिकू, जांभूळ, पिंपळ, उंबर, बदाम, विलायती, चिंच, शिशम, फणस, बहावा, चाफा, गुलमोहर, अशोक, सोनमोहर, पर्जन्यवृक्ष, आवळा, वड, सीताफळ, रॉयल पाम, चेरी, करंज, निम

देशी झाडे कोणती

नागकेश्वर, कांचन, कदंब, निम, मोहगनी, बहावा, सीता अशोक, बकुळ, निंबोळी, ताम्हण, पारिजातक, रायआवळा, चिंचकरंज, चाफा

पालघरमध्ये लागवड

मुंबईतील कापलेल्या झाडांच्या बदल्यात मुंबईतच झाडे लावणे आवश्यक होते. मुंबई शहरामध्ये झाडे लावण्यासाठी प्रचंड जागा आहे. ही झाडे आरे अथवा नॅशनल पार्कमध्येही लावता येतात. पण मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील अक्करपट्टी येथे झाडे लावण्यात परवानगी दिली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या या परवानगीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हरकती सूचना आल्याच नाही

झाडे कापण्या संदर्भात हरकती सूचना मागवल्या होत्या. मात्र हरकती सूचना आल्याच नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांना ईमेलद्वारे आक्षेप व सूचना नोंदवण्यासाठी विनंती करण्यात आली होती यासाठी उद्यान अधीक्षक यांच्या दालनात सुनावणी ही ठेवण्यात आली होती. मात्र या सुनावणीसाठी कोणीही हजर नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.