Mumbai Water Cut : मुंबईत पाणीबाणी!

पाणी न आल्याने नागरिकांचे हाल
Mumbra water cut
Mumbra water cutPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गाव दरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे गुरुवारी सकाळी दादर, अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रुझ, भांडुप आदी भागात पाणी आलेच नाही तर घाटकोपर विक्रोळी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती.

सहार गाव दरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे कामामुळे दादर जी उत्तर, अंधेरी के दक्षिण, जोगेश्वरी के उत्तर, सांताक्रुझ एच पूर्व आणि भांडुप एस विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवार २६ नोव्हेंबर सकाळी ९ वाजल्यापासून शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर घाटकोपर, विक्रोळी येथील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची पूर्वकल्पना मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दिली होती. तरीही नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. नेहमी मुबलक पाण्याची सवय लागलेल्या या भागातील नागरिकांना पाण्याची तहान भागवण्यासाठी अखेर टँकर मागवावे लागले.

Mumbra water cut
Tiger Shroff Firing Case : टायगर गोळीबारातील एक आरोपी अल्‍पवयीन

धारावी लूप मार्ग, प्रेम नगर, नाईक नगर, धारावी मुख्‍य रस्‍ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर, कुंभारवाडा, विजय नगर मरोळ, मिलिटरी मार्ग, गावदेवी, मरोळ गाव, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ वसाहत आदी भागात पाणीटंचाईची मोठी झळ बसली. या भागात सकाळी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा

पालिकेच्या ५ विभाग कार्यालयाच्या हद्दीत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद असल्यामुळे या भागात नागरिकांच्या मागणीनुसार पाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. दिवसभरात सुमारे ७० ते ८० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Mumbra water cut
LPG Gas Delivery OTP Problem : ओटीपीच्या कचाट्यात गॅस ग्राहकांची ससेहोलपट

आजही सकाळी पाणी येणार नाही

  • शुक्रवार २७ नोव्हेंबरलाही सकाळी १० वाजेपर्यंत पाणी कपात असल्यामुळे नेहमीप्रमाणे येणारे पाणी येणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

  • यात ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहरामपाडा, खेरनगर, निर्मल नगर, वांद्रे (पूर्व), ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र), कार्गो संकुल या भागाचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.