मुंबई: महालक्ष्मी मंदिरासमोर कारने २ मुलींना उडविले; थरकाप उडविणारा व्हिडिओ समोर

मुंबई: महालक्ष्मी मंदिरासमोर कारने २ मुलींना उडविले; थरकाप उडविणारा व्हिडिओ समोर
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्ता ओलांडताना एका बेदरकार गाडीने दोन लहान मुलींना उडविले. ही थरकाप उडविणारी घटना शनिवारी (दि.२०) सकाळी घडली. या दोन्ही जखमी मुलींना नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ऐशानी जाधव ( वय १४) आणि जान्हवी कनोजिया (वय १४) अशी या जखमी मुलींची नावे आहेत. या अपघाताची दखल बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि शिवसेना प्रवक्त्या अॅ़ड. सुशीबेन शाह यांनी घेतली आहे. त्या आज सायंकाळी मुलींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तसेच या मुलींच्या पालकांची भेट घेण्यासाठी नायर हॉस्पिटल येथे जाणार आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news