Mumbadevi Temple Chaitra Navratri : श्री मुंबादेवी मंदिरात आजपासून चैत्र नवरात्र उत्सव

मंदिर 16 तास खुले राहणार
Mumbadevi Temple Chaitra Navratri
मुंबई : भाविकांना मुंबादेवीचे दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी दर्शन रांगेत भव्य मंडप उभारण्यात आला आहे.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईची ग्रामदेवता श्री मुंबादेवी मंदिरात गुढी पाडवा चैत्र नवरात्र उत्सव आज गुरुवारपासून (दि.19) सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव 27 मार्चपर्यंत असणार आहे. उत्सव काळात मंदिर रोज सकाळी साडेपाच ते रात्री 10 वा.पर्यंत असे 16 तास भाविकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती श्री. मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधी हेमंत पु.जाधव यांनी दिली.

गुरुवारी सकाळी 7 ते 8 यावेळेत घटस्थापना होणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि.23) सायंकाळी 6 वा मंदिरात दीपोत्सव तर 26 मार्चला दुर्गाष्टमी व दुसऱ्या दिवशी 27 ला श्री रामनवमी हवन -श्री नवचंडी महायज्ञ पहाटे साडेतीन वाजता प्रारंभ होणार असून पुर्णाहुती सकाळी 8 ते 8.30 वा. यावेळेत होईल.

Mumbadevi Temple Chaitra Navratri
Mithi River : मिठी नदीची सफाई आणखी लांबणीवर

दिवसभरात मंगला आरतीसह मुख्य आरती, नैवेद्य, धुप व शयन अशा विविध आरत्या होणार आहेत. मंदिराच्या शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तासह सुरक्षारक्षक कार्यरत राहणार आहेत.

Mumbadevi Temple Chaitra Navratri
Devendra Fadnavis : प्लास्टिक फुलांच्या बाजारावर कारवाईचे महापालिकांना अधिकार : फडणवीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news