Mithi River : मिठी नदीची सफाई आणखी लांबणीवर

कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पेच
Mithi River
Mithi RiverPudhari
Published on
Updated on

मुंबई : मिठी नदी सफाई लांबणीवर पडल्यामुळे यंदा पश्चिम व पूर्व उपनगर पाण्याखाली जाण्याची भीती आहे. यावरून बुधवारी स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत, मिठीची सफाई होणार की नाही, असा सवाल केला. पुढील बैठकीत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.

मिठी नदीची सफाई अद्याप सुरू झाली नसल्याचा हुकतीचा मुद्दा काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी उपस्थित केला. सफाईसाठी अद्याप कंत्राट देण्यात आले नाही. कंत्राटदार प्रतिसाद का देत नाहीत. सफाई वेळेत झाली नाही व मुंबईची तुंबई झाली तर जबाबदार कोण, असा सवाल यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.

Mithi River
Ritu Tawde court case : महापौर रितू तावडे अडचणीत; मारहाणीचा खटला चालणार

यावेळी शहरातील बहुतांश नाल्यांची सफाई सुरू न झाल्याकडे नगरसेवकांनी समितीचे लक्ष वेधले. यात अंधेरी सबवेमध्ये तुंबणाऱ्या पाण्याकडे लक्ष वेधत, पाणी तुंबण्यास कारणीभूत होणाऱ्या मोगरा नाल्याची सफाई झाली नसल्याचे शिवसेनेचे यशोधर फणसे निदर्शनास आणले.

मिठी नदीची सफाई कधी होणार, अशी विचारणा गेल्या आठवड्यात समिती सदस्यांनी केली. याचे उत्तर अथवा निवेदन समितीत करणे आवश्यक होते. पण प्रशासनाला फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात पाणी तुंबले तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.

दरम्यान समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची गंभीर दखल घेत, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पुढील आठवड्यात कोणतेही परिस्थितीत मिठी नदीसह नालेसफाईचा अहवाल प्रशासनाने समितीत सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

Mithi River
Prakash Abitkar : राज्यात लवकरच 1400 डॉक्टर्सची होणार भरती

प्रशासनाची गप्प बसण्याची भूमिका

मिठी नदीच्या सफाईची निविदा बुधवारी उघडणार होती. मात्र समितीत याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी दिले नाही. प्रशासनाच्या गप्प बसण्याच्या भूमिकेमुळे मिठी नदीच्या निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जात आहे.

पालिकेकडून नालेसफाई सुरू

मुंबई : निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने मिठी नदीची सफाई लांबणीवर पडलेली असताना प्रशासनाने बुधवारपासून मोठे आणि लहान नाले सफाईच्या कामाला बुधवारपासून सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यातील वॉर्डनिहाय सफाईचे काम हाती घेतले असून ते 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

सात झोनपैकी तीन झोनचे काम सुरू झाले आहे. तर तीन झोनमध्ये जुनेच कंत्राटदार असल्याने त्याठिकाणी नव्याने निविदा काढण्यात आल्या नाहीत. मात्र एका झोनसाठी अद्यापही कंत्राटदाराचा प्रतिसाद न मिळाल्याने त्या झोनमधील नालेसफाई पुढील आठवड्यात सुरू होईल असे बांगर यांनी सांगितले.

डॅश बोर्डवर आकडेवारी टाकणार

मुंबईतील नाले सफाईची संपूर्ण माहिती, आकडेवारी आणि चित्रफीत ही महापालिकेच्या डॅश बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. नगरसेवकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news