Mulund Metro Accident Compensation: मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; दोन कोटी भरपाईची मागणी

सरकारी नोकरीसह संपूर्ण वैद्यकीय खर्चाची मागणी; लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा
Mulund Metro Pillar Slab Collapse
Mulund Metro Pillar Slab Collapse
Published on
Updated on

मुलुंड : मुलुंड येथील एलबीएस मार्गावर मेट्रो-4 मार्गिकेच्या झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रामधनी यादव यांच्या कुटुंबीयांनी दोन कोटी रुपयांची भरपाई, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी तसेच जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकारने उचलावा, अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशाराही नातेवाइकांनी दिला. मृतदेह मुलुंडमधील उपासनी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

Mulund Metro Pillar Slab Collapse
Maharashtra Ministry Bribery: लाचखोर ढेरिंगेची प्रतिनियुक्ती रद्द; मंत्रालयातील लाच प्रकरणी मंत्री झिरवाळांचे कठोर आदेश

रामधनी यादव यांच्या कुटुंबीयांना एकूण 35 ते 40 लाखांची मदत जाहीर झाली आहे. यापैकी 15 लाख एमएमआरडीएकडून आणि 5 लाख शासनाकडून मिळणार आहेत. तसेच विमा योजनेंतर्गत 15 ते 20 लाखांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या प्रकरणात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कंत्राटदारावर पाच कोटी रुपये, तर सल्लागार कंपनीवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रामधनी यादव हे उत्तर प्रदेशातील एका गावाचे सरपंच होते. त्यांचा परिवार मोठा असून त्यांच्या तीन मुलींची अद्याप लग्ने झालेली नाहीत. अशा परिस्थितीत मुलींची लग्ने कशी करायची, असा प्रश्न नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.

Mulund Metro Pillar Slab Collapse
Sunetra Pawar: अजितदादांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण; पाहा व्हिडीओ

या दुर्घटनेत 45 वर्षीय राजकुमार यादव जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. 52 वर्षीय महेंद्र यादव, 40 वर्षीय दीपा रुहिया यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करणे, उपचार, शस्त्रक्रिया, औषधे, पुनर्वसन तसेच पुढील तपासणी यांसह संपूर्ण वैद्यकीय खर्च एमएमआरडीए उचलणार आहे.

Mulund Metro Pillar Slab Collapse
Govandi air pollution | गोवंडीची हवा अत्यंत धोकादायक

पाच अधिकाऱ्यांना अटक ,कंपनीवर गुन्हा दाखल

मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघातात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्ट्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news