Govandi air pollution | गोवंडीची हवा अत्यंत धोकादायक

निर्देशांक 463 वर : मुंबई, नवी मुंबईची हवा बिघडलेलीच, बेलापूर 177 वर
Govandi air pollution
Govandi air pollution | गोवंडीची हवा अत्यंत धोकादायक
Published on
Updated on

मुंबई : मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारण्याचे नाव घेत नाही.गोवंडी पूर्वचा निर्देशांक 463 इतका नोंदवला गेला.त्यापाठोपाठ जुहूतारामध्ये हा निर्देशांक 390 वर पोहोचला होता. रविवारी वाहनांची वर्दळ कमी असूनही मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 180 इतका नोेंदवला गेला. त्याचबरोबर स्वच्छ शहर म्हणून गणल्या गेलेल्या नवी मुंबईची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. या ठिकाणी हा निर्देशांक 178 होता.

मुंबई पूर्वेच्या आर्य चाणक्य नगरातही हवा प्रदूषित होती. येथे निर्देशांक 261 वर जाऊन पोहोचला होता. अंधेरी पूर्व, अ‍ॅण्टॉप हिल, अणुशक्तीनगर, आरामनगर, वांद्रे पूर्व, वांद्रे-कुर्ला संकुल, भक्ती पार्क, भांडुप पश्चिम, भोईवाडा, चेंबूर, दहिसर पूर्व, लोखंडवाल कॉम्प्लेक्स, येथे सरासरी 170 ते 190 च्या आसपास निर्देशांक होता. नवी मुंबईत सीबीडी बेलापूर येथे हा निर्देशांक 177 इतका नोंदवला गेला. खारघरमध्ये हा निर्देशांक 173वर पोहोचला होता. नेरूळ पूर्वमध्ये तो 168 होता, तर पनवेल रेल्वे स्थानकाजवळ 184, सानपाडा रेल्वे स्थानक 174, सीवूड्स 169 अशी हवेची स्थिती होती.

वाढते तापमान (22/35 अंश सेल्सिअस) पाहता प्रदूषणामध्ये घट होण्याचा अंदाज होता. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. संध्याकाळनंतर थंडी जाणवत आहे. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत गारठा कमी झाला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये (21/34 अंश सेल्सिअस) तापमानात थोडी घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे. मात्र, वातावरण ढगाळ राहील, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाढते वायू प्रदूषण कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news