MPSC Students Protest | राजकीय अहंकारापायी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे अयोग्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या
Devendra Fadanvis
Devendra FadanvisPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर असून त्यांच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून तसे निर्णयही केले. तरीही, केवळ स्वतःच्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा, अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळ्या मागण्या मान्‍य झाल्यावरही राजकीयदृष्ट्या एखाद्या गोष्टीचा ‘इगो’ करणे अयोग्य आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी आंदोलनावरून सुरू झालेल्या राजकारणावर भाष्य केले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्‍या आंदोलनासह ‘गोकुळ’ची निवडणूक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीबाबतही भाष्य केले.

Devendra Fadanvis
Tribal Students Mumbai Protest : आम्ही पुन्हा येऊ; इशारा देत गेले आदिवासी विद्यार्थी

अध्यक्षांचा राजीनामा राज्याच्या हातात नाही

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही असल्याबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना पदावरून हटवणे, हे राज्य सरकारच्या हातात नाही.

Devendra Fadanvis
Chinchondi Patil School Mobile Free Initiative: शाळेची घंटा वाजली की मोबाईलला विराम! १६ शिक्षकांचा ‘मोबाईलमुक्त शालेय वेळ’ उपक्रम

संविधानातील तरतुदीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर किंवा शिफारशीनुसार राष्ट्रपतींकडूनच त्यांना हटवता येते. ही बाब सर्वांना माहिती आहे. शिवाय, ज्यांचा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी पेपरफुटीची घटना घडली, त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करा, अशी मागणी आहे. मात्र, ज्या अध्यक्षांनी पेपरफुटीनंतर पदभार स्वीकारला, त्यांना कोणतीही चौकशी न करता जबाबदार धरून हटवण्याची मागणी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.

‘पुणे शिक्षक’ बाबत चर्चा सुरू राहील

पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत आमचे एकमत झाले नाही. त्यामुळे दोघांनीही फॉर्म भरायचे आणि त्याचबरोबर चर्चा सुरू ठेवायची, असे ठरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमची चर्चा होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीबाबत बोलताना सांगितले.

‘गोकुळ’ची निवडणूक एकत्र लढू

‘गोकुळ’ची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढेल. सध्या तिथले नेतृत्व हसन मुश्रीफ करत आहेत आणि तेच या निवडणुकीत पुढाकार घेतील. त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांचे इतर सर्व नेतेही एकत्रितपणे काम करतील. आमच्याकडून चंद्रकांत पाटील, महाडिक असतील. तसेच, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर आणि इतर स्थानिक नेतेही एकत्र येऊन ही निवडणूक लढतील. ही स्थानिक आणि सहकार क्षेत्रातील निवडणूक असल्याने, माझ्या स्तरावर याबाबत काही चर्चा होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news