MPSC Paper Leak Case | एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहार : चौकशी आयोगाने मागवली निवेदने

१६ नोव्हेंबरपर्यंत मुदत; प्रतिज्ञापत्राचे नमुना प्रारूप उपलब्ध
Paper Leak
Paper LeakPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने संबंधितांकडून निवेदने मागवली आहेत. परीक्षार्थी, विद्यार्थी, माहिती असलेल्या व्यक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांनी आपली निवेदने १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावीत, असे आवाहन आयोगाने केले आहे.

निवेदन सादर करण्यासाठी आयोगाने प्रतिज्ञापत्राचे निश्चित प्रारूप उपलब्ध करून दिले आहे. संबंधितांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत निवेदन तयार करून ते नोटरीकृत प्रतिज्ञापत्रासह आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात. तसेच नोटरीकृत प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या ई-मेलवरही पाठवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Paper Leak
Maharashtra Skill Development Scheme : पहिल्या टप्प्यातील शंभर महात्मा जोतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्रांना मान्यता

निवेदन सादर करण्यासाठी आयोगाने प्रतिज्ञापत्राचे निश्चित प्रारूप उपलब्ध करून दिले आहे. संबंधितांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत निवेदन तयार करून ते नोटरीकृत प्रतिज्ञापत्रासह आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे.

निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात. तसेच नोटरीकृत प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या ई-मेलवरही पाठवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Paper Leak
MPSC Group C Recruitment : एमपीएससी ‘गट-क’ पदसंख्या ११ हजारांनी वाढवा, वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत द्या

आपली निवेदने complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावे. किंवा दालन क्र. २०१, दुसरा मजला, अन्न व औषध प्रशासन भवन, बीकेसी, वांद्रे (पूर्व), या पत्यावर प्रत्यक्ष अथवा कुरियन पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने संबंधितांकडून निवेदने मागवली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.