MPSC Paper Leak: औषध निरीक्षक भरतीचा पेपर मिळवण्यासाठी मोजले ५० लाख? ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट समोर

MPSC Paper Leak
MPSC Paper Leakpudhari
Published on
Updated on

MPSC Paper Leak Rutuja patil Chats: नुकतेच एमपीएससीचा औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याने राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलचे अनेक चॅट सध्या व्हायरल होत असून आता नवे व्हॉट्स अॅप चॅट समोर आले आहेत. या नव्या चॅटमध्ये पेपर फोडण्यासाठी तब्बल ५० लाख रूपये मोजल्याचा दावा केला जात आहे. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेआधीच मिळवण्यासाठी ५० लाख रूपये भरले आहेत असं ऋतुजा या चॅटमध्ये सांगत आहे.

MPSC Paper Leak
MPSC Paper Leak Case | पार्किंगमध्येच प्रश्न संचाची देवाणघेवाण; एमपीएससी अधिकाऱ्यामार्फत पेपर बाहेर

एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटला त्याच्या चौकशीत ५ लाख रूपये देण्यात आल्याची बाब समोर आली होती. मात्र आता ऋतुराजाच्या नव्या लीक चॅटमध्ये ५० लाख रूपयांचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

MPSC Paper Leak
MPSC Paper Leak: औषध निरीक्षक भरतीचा पेपर मिळवण्यासाठी मोजले ५० लाख? ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट समोर

एमपीएससीतील तीन अधिकारी सध्या गुन्हे शाखेच्या अटकेत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र आता ऋतुजाचे नवे चॅट समोर आले अन् पेपरफुटीमध्ये पैशाचा मोठा खेळ झाल्याची शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. आकडा ऐकून सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

आता पेपर फक्त ५ लाखात फुटला की त्याची आणखी मोठी रक्कम ऋतुजाच्या वडिलांनी मोजली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

MPSC Paper Leak
MPSC Paper Leak: पेपरफुटीचा थेट MPSCपर्यंत हात; अवर सचिवासह 6 जणांना अटक, तपासात खळबळजनक खुलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news