पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणुकीत चोऱ्या चपाट्या करून विजय मिळवणं म्हणजे जनाधार नाही. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या शत्रूंनी कारस्थान करून शिवसेना फोडली, हे मुघलांच्या नंतरच महाराष्ट्रावरील सर्वात मोठं आक्रमण आहे, जे मोदी शहांनी केलं. ५-६ जागा जिंकले म्हणजे शिवसेना त्यांची होत नाही. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना आहे, शिंदे प्रकरण काही दिवसात बंद होणार, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही ईव्हीएमच्या विरोधात नाही तर प्रशासनाच्या विरोधात तक्रार केली आहे. रविंद्र वायकर ईडी आणि सीबीआयला घाबरून पळून गेले. मतमोजणीत फेरफार करून वायकर विजयी झाले हे आता उघड होईल. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांनी वर्धापनदिन साजरा करू नये, असे राऊत म्हणाले.
उत्तर पश्चिम मुुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे आढळलेल्या मोबाईल प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. 4 जून रोजी मतमोजणी केंद्रात पंडिलकर यांच्याकडे मोबाईल फोन आढळला. पण प्रत्यक्षात 16 जूनला गुन्हा दाखल झाला. या मधल्या दहा दिवसांच्या काळात तो मोबाईल बदलला गेला असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अॅड. अनिल परब यांनी केला.
हेही वाचा :