वायकरांच्या मेहुण्याने वापरलेला मोबाईल गायब

वायकरांच्या मेहुण्याने वापरलेला मोबाईल गायब

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : उत्तर पश्चिम मुुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे आढळलेल्या मोबाईल प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. 4 जून रोजी मतमोजणी केंद्रात पंडिलकर यांच्याकडे मोबाईल फोन आढळला. पण प्रत्यक्षात 16 जूनला गुन्हा दाखल झाला. या मधल्या दहा दिवसांच्या काळात तो मोबाईल बदलला गेला असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी केला.

उत्तर पश्चिम मुुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर हे मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलताना आढळल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे धुमारे फुटू लागले आहेत. यासंदर्भात रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. सोमवारी शिवसेना भवन येथे शिवसेना नेते (ठाकरे गट), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी सूर्यवंशी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आक्षेप घेतला.

अनिल परब यांचे मुद्दे

पंडिलकर यांच्याबाबत आक्षेप घेतल्यानंतर तो मोबाईल काढून बाहेर पाठवला गेला. मग डाटा एंट्रीसाठी कुठला मोबाईल वापरला?
निवडणूक आयोगाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला हवी. लवकरच आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.
मागणी करूनही फॉर्म 17 सी-2 देखील नाकारले गेले. त्यामुळे आमच्या आणि त्यांच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news