Sanjay Dina Patil Video: कशाला माझ्या XXX मध्ये घुसताय?... नाहीतर मारून पाठवीन; खासदार संजय दिना पाटीलांची पत्रकारांना धमकी

Sanjay Dina Patil Video: खासदार संजय दिना पाटील यांचा पत्रकारांशी झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Sanjay Dina Patil Video
Sanjay Dina Patil VideoPudhari
Published on
Updated on

Sanjay Dina Patil Video: ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांवरून आधीच राजकीय वातावरण तापले असताना, आता पत्रकारांशी झालेल्या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांनी आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत पत्रकारांशी उग्र भाषेत संवाद साधल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या दृश्यांमध्ये संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कॅमेरा बंद करण्यास सांगितल्याचे आणि वारंवार प्रश्न विचारल्यास कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत इशारा दिल्याचे ऐकू येते. तसेच त्यांनी संतापाच्या भरात अर्वाच्य भाषेचाही वापर केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Sanjay Dina Patil Video
Indian Citizenship: पासपोर्ट, आधार, PAN, वोटिंग कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही? मग भारतीय नागरिकत्व कसं ठरतं? जाणून घ्या नियम

संतापाच्या भरात संजय दिना पाटील म्हणाले: “अरे भाई, बस झालं ना आता! किती अति करताय? बंद करा कॅमेरा. मी खासदार आहे हे विसरून जाईन. इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय, आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!”

या घटनेनंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लोकप्रतिनिधीने माध्यमांशी अशा प्रकारे वागणे योग्य नसल्याची टीका अनेकांकडून केली जात आहे. दुसरीकडे, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावरही विविध प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर संजय दिना पाटील यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच या घटनेबाबत कोणती कायदेशीर कारवाई किंवा अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांमधील संवादाची पद्धत, सार्वजनिक वर्तन आणि अभिव्यक्तीच्या मर्यादा यावर चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news