मुंबई ः मान्सूनने मंगळवारी महाराष्ट्र सोडला. मात्र आता अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ऐन दिवाळीत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मंगळवारी मान्सूनने महाराष्ट्रातून दक्षिण भारतात प्रवेश केला असला तरीही ऐन दिवाळीत अवकाळी पावसाचा अंदाज आहे. बुधवारी 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान राज्यात सहा दिवस ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
आज-उद्या जास्त पाऊस
राज्यात बुधवारी-गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे. बुधवारी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अकोला, बुलडाणा, वाशिम हिंगोली, परभणी, जालना, बीड, सांगली, सातारा आणि गुरुवारी कोल्हापूर, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, सह्याद्री घाटमाथा व संपूर्ण कोकणात पावसाचा अंदाज आहे.