Fish Price Hike: कापरी पापलेट, घोळ दोन हजारांवर; म्हावऱ्याला आयलाय सोन्याचा भाव

सुरमई १८०० रुपये किलो
Fish Market
Fish MarketPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: १ जूनपासून खोल समुद्रात पावसाळी मासेमारी बंदी घातल्यानंतर मासळीची आवक प्रचंड घटली आहे. परिणामी बाजारात मासळीचे दर चांगलेच वाढले आहेत. बाजारात कापरी पापलेट, घोळ मासा दोन हजारांवर तर सुमरमई आठशे रुपये किलोवर गेली आहे.

१ जूनपासून ३१ जुलैपर्यंत म्हणजे ६१ दिवसांची यावर्षी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात ताज्या मासळीची उपलब्धता कमी झाल्याने मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत वाढली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या मासळीचे दर वाढले आहेत.

Fish Market
Engineering Diploma Admission: अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी २२ जूनपर्यंत अर्ज करता येणार! आतापर्यंत ८७ हजार अर्ज

मासळीला अक्षरशः ‌‘सोन्याचा भाव‌‘ आला असल्याचे चित्र नवी मुंबईतील मासळी बाजारात आहे. सध्या वाढलेल्या दरांमुळे खवय्यांचा हिरमोड होत असला, तरी समुद्रातील संपत्ती टिकवण्यासाठी आणि भविष्यात भरघोस मासेमारीसाठी ही बंदी आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Fish Market
Mumbai University ChatGPT: चॅट जीपीटीच्या मदतीने अभ्यास साहित्य निर्मिती; मुंबई विद्यापीठातील प्रकार

मासळीचे दर (किलो)

सुरमई: १,८००

कापरी पापलेट: २,२००

पापलेट: १,५००

घोळ: २,०००

हलवा: १,०००

कोळंबी: ८००

बांगडे (सहा नग): ४००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news