Mumbai University ChatGPT: चॅट जीपीटीच्या मदतीने अभ्यास साहित्य निर्मिती; मुंबई विद्यापीठातील प्रकार

सीडीओईच्या कारभाराविरोधात संताप
Mumbai University ChatGPT
Mumbai University ChatGPTPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील (सीडीओई) पदव्युत्तर मानसशास्त्र अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यास साहित्यात चॅटजीपीटीसारख्या (एआय) साधनांचा वापर झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केल्यानंतर विद्यापीठाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पदव्युत्तर मानसशास्त्र अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्रातील ‘सोशल प्रॉब्लेम्स : स्किल्स अँड इंटरव्हेन्शन’ या पुस्तकातील एका प्रकरणाच्या शेवटी ‘नेक्स्ट स्टेप फॉर यू : वुड यू लाइक टू जनरेट युनिट-२ स्पेसिफिक इंटरव्हेन्शन स्ट्रॅटेजीज...’ असा मजकूर आढळून आला.

Mumbai University ChatGPT
E85 Fuel: केंद्र सरकारने आणले ‘ई ८५’ इंधन; पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त

हा मजकूर चॅटजीपीटीकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांप्रमाणे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे अभ्याससाहित्याची गुणवत्ता आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचे अभ्याससाहित्य हेच शिक्षणाचे प्रमुख साधन असते. विशेषतः नोकरी सांभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी या साहित्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.

मानसशास्त्र विभागातील एका निवृत्त प्राध्यापकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बोलताना, विद्यापीठीय अभ्याससाहित्य हे विषयतज्ज्ञांकडून तयार होऊन त्याची शैक्षणिक पडताळणी होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. हा प्रकार केवळ मानसशास्त्र विषयापुरता मर्यादित नसून इतर काही अभ्यासक्रमांमध्येही अशाच स्वरूपाचा वापर झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने मात्र प्रश्नपत्रिका फुटीच्या आणि एमकॉम निकालातील त्रुटींच्या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या मानसशास्त्र अभ्यासक्रमाच्या अध्ययन साहित्याच्या आशय निर्मितीबाबत संबंधित आशय निर्मात्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे अध्ययन साहित्यात स्पष्टपणे नमूद केले आहे.

Mumbai University ChatGPT
Mrinaltai Gore Flyover: गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तारित मार्ग खुला; स्वामी विवेकानंद मार्गाची कोंडी फुटणार

सदर एआय टूल्सचा वापर हा केवळ व्याकरणीय शुद्धता, भाषिक परिष्करण, आशयाची सुसंगतता व वाचनीयता वाढविणे तसेच संपादकीय सहाय्य मिळविणे या मर्यादित उद्देशांसाठी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, त्याचे प्रमाण प्रचलित स्वीकारार्ह निकषांनुसार (युजीसी, एएनआरएफ/ आयसीएसएसआर यांच्या संशोधन प्रस्तावाच्या मार्गदर्शक सूचना) १० टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे विद्यापीठाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

मनसे विद्यार्थी सेनेकडून राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) विद्यार्थी सेनेचे सचिव नितीन ननावरे यांनी सीडीओईच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत संचालकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बीकॉम तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिका सलग तीन दिवस फुटण्याचा प्रकार, एमकॉमच्या २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांमधील चुका, विद्यार्थ्यांच्या घरांपासून ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील परीक्षा केंद्रांचे वाटप, अभ्याससाहित्य व पाठ्यपुस्तकांच्या वितरणातील विलंब आणि आता चॅटजीपीटीच्या वापराबाबतचे आरोप, या सर्व घटनांमुळे सीडीओईच्या प्रशासनावरील विश्वास उडाल्याचा आरोपही त्‍यांनी केला.

सखोल पडताळणीसाठी समिती गठित

सदर अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेली ही स्व-अध्ययन मार्गदर्शिका स्वरुपात असून पुस्तक म्हणून ग्राह्य धरली जात नाही. तथापि, या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल पडताळणी व वस्तुनिष्ठ शहानिशा करण्यासाठी सीडीओईने समिती गठित केली असून, समितीमार्फत आवश्यक तपासणी व पुढील कार्यवाही सुरू आहे, असेही विद्यापीठाने पाठवलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news