Mumbai Mono : वडाळा आगार-चेंबूरदरम्यान रविवारी सकाळी मोनो सेवा राहणार बंद

Mumbai Mono : वडाळा आगार-चेंबूरदरम्यान रविवारी सकाळी मोनो सेवा राहणार बंद

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मोनोरेलच्या नियमित देखभाल दुरुस्ती अंतर्गत महत्त्वाच्या स्थापत्य दुरूस्तीच्या कामासाठी रविवारी (दि.२४) सकाळी  वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची मोनो सेवा बंद राहणार आहे. तर  रात्री ८ नंतर १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. तर संत गाडगे महाराज चौक ते वडाळा आगार या स्थानकादरम्यानची सेवा मात्र सुरळीत राहणार आहे. या फेऱ्या १८ मिनिटांच्या अंतराने सुरू राहणार असून रविवारी मोनोच्या एकूण ११४ फेऱ्यांचा माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे. Mumbai Mono

त्याचप्रमाणे सोमवारी (दि. २५)  वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानकादरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. याप्रमाणे सोमवारी मोनोच्या एकूण १४७ फेऱ्यांचा माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे. Mumbai Mono

Mumbai Mono प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखभाल दुरुस्तीच्या कामांचे नियोजन

मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना विनव्यत्यय प्रवास करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत असतो. मोनोरेलची नियमित देखभाल दुरुस्तीची कामे पार पाडत आहे. प्रवाशांचा सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चीत करत आहोत. मुंबई मोनोरेलच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान होणार व्यत्यय टाळण्याच्या दृष्टिकोनातून सदर देखभाल दुरुस्तीचे काम हे सुट्टीच्या दिवशी हाती घेण्यात आले आहे. तसेच मंगळवारी (दि.२६) मोनोरेलची सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. मुंबई मोनोरेल प्रवाशांना विनंती आहे की, वरील बाबींचे अवलोकन करून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news