Money Trade Coin Scam: ‘मनी ट्रेड कॉइन’ घोटाळ्याच्या सूत्रधाराचे दुबईत वास्तव्य

मुंबई-ठाण्यात ईडीची धाड; एक कोटी जप्त; अर्थ मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवले
Money Trade Coin Scam
Money Trade Coin ScamPudhari
Published on
Updated on

मुंबई: ‘मनी ट्रेड कॉइन’ (एमटीसी) या अनधिकृत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची तब्बल ११३.१० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि ठाण्यात छापे टाकले. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमित मदनलाल लखनपाल याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपण केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवल्याचा ईडीचा आरोप आहे.

Money Trade Coin Scam
Rickshaw Driver Viral Video: मराठीची भीती! ऑटो रिक्षा थेट ट्रेनमध्ये चढवत गाव गाठले

एमटीसी या क्रिप्टोकरन्सीला लवकरच सरकारी मान्यता मिळणार असल्याचे सांगून त्याने लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. दिल्ली, पुणे आणि नाशिक येथे यासाठी सेमिनारही घेण्यात आल्याचे तपासात समोर आले.

ईडीच्या तपासानुसार, ऑगस्ट २०१७ ते एप्रिल २०१८ या काळात एमटीसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यात आले. या काळात सुमारे ११३.१० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

एमटीसीला विश्वासार्ह दाखवण्यासाठी विविध योजना आणि एक्स्चेंज प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये कॉईन डिपॉझिट रेशो, एमटीसी बँक्यू, एमटीसीएक्स इंडिया आणि क्रिप्टोझानिया यांचा समावेश होता. या माध्यमातून एमटीसीच्या किमतीत कथित फेरफार करण्यात आला. त्यानंतर ट्रेडिंग आणि पैसे काढण्याची सुविधा बंद करण्यात आल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकले.

Money Trade Coin Scam
Navi Mumbai Crime: अमली पदार्थ कारवाईनंतर १५०० आफ्रिकन नागरिकांना पाठवले मायदेशी; तीन वर्षांतील आकडेवारी

आरोपींचे परदेशात पलायन

तपासातील सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी अँटिग्वा आणि बार्बुडा येथील पासपोर्ट मिळवल्याचे ईडीच्या तपासात आढळले आहे. त्यानंतर त्यांनी भारत सोडल्याचा आरोप आहे.

लखनपाल सध्या दुबईत बनावट ओळख वापरून राहत असल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता केवळ भारतातील आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित न राहता आरोपींच्या परदेशातील हालचाली आणि मालमत्तांकडेही वळला आहे. एमटीसी प्रकरणातील कथित फसवणूक २०१७-१८ मध्ये झाली होती.

डिजिटल पुरावेही हाती

मुंबई आणि ठाण्यातील छाप्यांमध्ये रोकडेसोबत लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या उपकरणांमधील माहितीच्या आधारे पैशांचा व्यवहार, गुंतवणूकदारांची माहिती आणि या कथित रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न ईडीकडून सुरू आहे.

या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांमधून आणि कागदपत्रांमधून आणखी आर्थिक व्यवहार व आरोपींची भूमिका समोर येण्याची शक्यता आहे, असे ईडीने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news