

Thane Crime News: ‘सत्याचा मोर्चा’ आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शाखाध्यक्ष रूपेश साबळे यांच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या मोर्चादरम्यान त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेली. ही चेन त्यांनी स्वतः मेहनतीने बनवली होती.
‘सत्याचा मोर्चा’दरम्यान मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. याच गर्दीत रूपेश साबळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली. सुरुवातीला गोंधळ आणि गर्दीमुळे त्यांना लगेच या चोरीची कल्पना आली नाही. परंतु नंतर त्यांना ती चेन हरवल्याचं लक्षात आलं आणि तातडीने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली, जी आता प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चोरी करणाऱ्या संशयित व्यक्तीचा फोटोही प्रसिद्ध केला आहे आणि नागरिकांना आवाहन केलं आहे की, फोटोतील व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास ती तात्काळ कळवावी.
अविनाश जाधव यांनी लिहिलं आहे, “ही चेन रूपेश यांनी स्वतः मेहनतीने बनवलेली आहे. त्यांच्यासाठी ही मोठी भावनिक व आर्थिक हानी आहे. जर कोणाला फोटोतील व्यक्तीबद्दल काही माहिती असेल, पाहिलं असेल किंवा त्या व्यक्तीचा ठावठिकाणा माहीत असल्यास कृपया संपर्क साधा.”
त्यांनी दोन संपर्क क्रमांक देखील शेअर केले आहेत:
रूपेश साबळे — 72088 88602
विनायक नलावडे — 97698 75369
अविनाश जाधव यांनी सर्व नागरिकांना ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून आरोपीचा लवकर शोध लागेल आणि साबळेंना न्याय मिळेल. मनसे कार्यकर्ते या घटनेबाबत संताप व्यक्त करत आहेत.