Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava 2026 : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरेंची तोफ दणाणणार

मेळाव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार
Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava 2026
मुंबई : गुरुवारी होणाऱ्या मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरू होती. (छाया ः दीपक साळवी)
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा गुरुवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर पक्षाचा हा पहिलाच मेळावा असल्याने राज ठाकरे यावेळी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava 2026
Gold price increase : आज सोन्याचे भाव वाढणार

राज्यात बंद पडणाऱ्या मराठी शाळा, इंग्रजी शाळांच्या संख्येत झालेली वाढ, मुंबई महानगरपालिकेचा आजही इंग्रजीत सुरू असलेला कारभार, अशा कळीच्या मुद्यांवर राज ठाकरे पुन्हा आपली भूमिका मांडतील आणि महाराष्ट्र सैनिकांना नवा कार्यक्रम देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त रायगडावरून सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. त्या अनुषंगाने पक्ष विस्ताराचाही अजेंडा या सभेत अपेक्षित आहे.

Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava 2026
El Nino impact on India monsoon: भारतासाठी चिंतेची बातमी! एल निनोचा यंदा मान्सूनवर परिणाम होणार? जागतिक हवामान संघटनेचा अंदाज

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबतही राज ठाकरे काय भाष्य करतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news