

मुंबई: राज्यातील विविध नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे. रायगड जिल्ह्यातील पाली नगर पंचायतीत स्वप्नाली विनायक जाधव व सुनंदा निशिकांत पाटील तर पोलादपूर नगर पंचायतीत संगीता संतोष तुराडे (शिंदे शिवसेना) विजयी झाल्या.
नाशिक जिल्ह्यातील देवळा नगर पंचायतीत प्रफुल्ला परशराम आहेर (अपक्ष) आणि पेठ नगरपंचायतीत गंगाबाई दिलीप थोरात (राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी झाल्या. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेत दिलीप निळकंठ चौरे (शिंदे शिवसेना) व शेख वसीमा आबिद (शिंदे शिवसेना) यांनी विजय मिळविला.
मनमाड नगर परिषदेत राजेंद्र दगडूजी पगारे (शिंदे शिवसेना) आणि अलका अशोक रासल (शिंदे शिवसेना) विजयी झाले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपंचायतीत देवयानी लीलाधर पाटील (भाजप) यांचा विजय झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी नगरपंचायतीत पार्वती सचिन गायकवाड ( शरद पवार गट ) विजयी झाल्या.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर पंचायतीत तनुजा सिद्धार्थकुमार सूर्यवंशी (ओबीसी बहुजन आघाडी), बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेत काझी सयमा अकेफ (भाजप) व राहुल शंकरराव खंडागळे (भाजप) यांनी विजय मिळविला. अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी हिदायत खान रूम खान (काँग्रेस) हे विजयी झाले.
सदस्यपदांच्या निवडणुकीत शितल प्रवीण पोहरे (काँग्रेस), मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर (काँग्रेस), आनंदा रामभाऊ तायडे (उबाठा), अश्विनी सुनील पाटील (भाजप), अजय गजानन पाटील (उबाठा), तुलसाबाई राजाराम गाडगे (भाजप), सुनीता साहेबराव वाघमारे (काँग्रेस), सद अहमद खान अजगर खान (काँग्रेस), सय्यद वसीम (विकास योद्धा मंच), बुशारा अंजुम मोहम्मद बाबर (विकास योद्धा मंच), शाजिया परवीन मोहम्मद कैसर (विकास योद्धा मंच), कमरुज्जमा आदिल खान (विकास योद्धा मंच), मोहम्मद फैज मोहम्मद मकसूद (विकास योद्धा मंच), सरवत जबीन सय्यद मुजाहिद इक्बाल (विकास योद्धा मंच), सय्यद मुजम्मिल हुसेन (विकास योद्धा मंच), शाहिस्ता फिरदोस मोहम्मद इरफान (विकास योद्धा मंच), सुमय्या सदाफ शेख उस्मान (काँग्रेस), मोहम्मद मेहताब अब्दुल रऊफ (काँग्रेस), ममता राजेश खोडे (काँग्रेस) आणि हुसेनाबी सय्यद अझीम (काँग्रेस) हे विजयी झाले.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत उमेश सदाशिव हरसुलकर (भाजप) आणि शारदा योगेश नाथे (भाजप) विजयी झाले. वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगरपंचायतीत तस्लीम शहा कैय्यूम शहा (अपक्ष), नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपंचायतीत रुपाली अजराव बुढे (भाजप) विजयी झाल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती नगरपंचायतीत लता साहेबराव राठोड (अपक्ष), तर सावळी नगरपंचायतीत सोनिका आकाश खोबरागडे (काँग्रेस) यांचा विजय झाला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा नगरपंचायतीत प्रतिभा रवी उईके (काँग्रेस), अहेरी नगरपंचायतीत संजना हनमंतु मडावी (शरद पवार गट) आणि गडचिरोली नगरपंचायतीत अंकुश (गोलू) दिलीप नैताम (भाजप) हे विजयी झाले.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतीत विशाल चंद्रशेखर शहारे (अपक्ष) आणि वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर नगरपंचायतीत आशिष कचारू म्हस्के (अपक्ष) हे विजयी झाले.